budget-session-amol-mitkari-akola: अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार मिटकरी यांनी विविध मुद्यांवर वेधले शासनाचे लक्ष

                                            file photo



भारतीय अलंकार 

अकोला: आमदार अमोल मिटकरी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विविध मुद्द्यांवर शासनाचे लक्ष वेधले सोबतच महत्त्वाच्या प्रकल्पाकरिता त्वरित निधी जाहीर करण्याची मागणी केली.



अकोला महानगरपालिकेने घेतलेल्या 139 बेकायदेशिर ठरावाबाबत शासनाचे लक्ष वेधत याप्रकरणी फौजदारी दाखल करण्याचे आदेश असतानाही या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे काम  महानगरपालिकेच्या आयुक्त यांनी केले. शहरांतील 52 ओपन स्पेस(भूखंड) संस्थाचालकाना दिले, याबाबत माहिती व अहवाल तपासून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.


अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये त्वरित प्राध्यापकांची पदभरती करावी तसेच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल लवकर सुरु करावे याबाबत पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून शासनाला अवगत केले


मूर्तिजापूर तालुक्यातील प्रकल्पामुळे पोही गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही अधांतरी असून पोही गावाचे पूर्णतः पुनर्वसन करावे याबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी मागणी केली.



अकोट शेगाव महामार्गावरील रौंदळा पासून रस्त्याचे बंद असलेले काम त्वरित करावे तसेच अकोट अकोला महामार्ग अनेक दिवसांपासून काम सुरू असून आतापर्यंत ही पूर्ण झालेला नाही तो त्वरित पूर्ण करण्याची कारवाई करावी याबाबत पुरवणी मागण्यामधून आमदार अमोल मिटकरी यांनी सूचना केली


विदर्भातील गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना निधी जाहीर करावा ही मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून केली आहे



जिल्ह्याच्या विकासाचा मूलमंत्र घेऊन शहरी भागापासून ग्रामीण भागातील प्रत्येकापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या योजना त्यांचे कार्य पोहोचावे या उद्देशानेच आपली आमदारकी असून शेतकरी सर्वसामान्य नागरिक व सर्वांचे हे सरकार असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी केले.

टिप्पण्या