asian-silver-medalist-boxer-palak -jhamre-arrives-home-town-akola: एशियन रौप्यपदक विजेती बॉक्सर पलक झामरेचे स्वगृही आगमन; अकोलेकर क्रीडा प्रेमींनी केले जोरदार स्वागत

अकोला रेल्वे स्टेशन येथे पलक चे आगमन व स्वागत




ॲड. नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: जॉर्डन, अमान येथे  झालेल्या युथ व ज्युनियर एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये अकोल्याची स्टार ज्युनिअर बॉक्सर पलक झांबरे 48 किलो वजन गटात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत रौप्यपदक पटकावले. भारतीय संघात पलक ही महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू होती.भारताला पलक कडून सुवर्ण पदकाची आशा होती. यासाठी पलकाने पूर्ण प्रयत्न केले. मात्र, रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. आज पलकचे स्वगृही अकोला शहरात आगमन झाले असून,अकोला बॉक्सिंग परिवार आणि क्रीडा प्रेमी नागरिकांकडून पलकाचे जोरदार स्वागत करण्यात आले. विजयी मिरवणूक काढण्यात आली.



राष्ट्रीय संघ निवड चाचणीत पलकने हरियाणाच्या बॉक्सरला धूळ चारून भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले होते. याच वर्षी महाराष्ट्रात झालेल्या दोन स्पर्धेत पलकने सुवर्ण पदक जिंकले. पलकची नजर जॉर्डन एशियन चॅम्पियनशिप सुवर्ण पदकावर खिळली होती. मात्र, रौप्य पदकवर तिला समाधान मानावे लागले.



भविष्यात भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणार

केक भरवून सतीशचंद्र भट यांनी पलक चे केले कौतुक



"पलक ही अकोला क्रीडा प्रबोधिनी प्रशिक्षण केंद्रची प्रशिक्षणार्थी असून, तिने अल्पावधीतच मोठी मजल मारली आहे. ज्युनियर एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये भारताला तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती. आणि तिने ती पूर्ण केली. भविष्यात भारतासाठी ती निश्चितच सुवर्ण पदक जिंकणार."

सतीशचंद्र भट

राज्य क्रीडा मार्गदर्शक 

क्रीडा प्रबोधिनी, अकोला




महाराष्ट्रतील एकमेव खेळाडू


भारतीय बॉक्सिंग फेडरेशनने 27 फेब्रुवारी ते 16 मार्च दरम्यान अमान, जॉर्डन येथे होणार्‍या 2022 ASBC आशियाई युवा आणि ज्युनियर पुरुष आणि महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप साठी 50 सदस्यांचा संघ निवडला होता. यात पलक ही महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू होती.




पलककडून होती सुवर्ण पदकाची आशा




अमान (जोर्डन) झालेल्या जूनियर एशियन चैम्पियनशीप मधे अकोलाची स्टार बॉक्सर पलक  झामरे हिने शानदार प्रदर्शन करीत कजाकिस्तानची बाक्सरला सेमीफाइनल मधे पराभूत करीत, एशियन चैम्पियनशीप के फाइनल मधे प्रवेश केला होता. जी.जोरधीन हिला पराभूत करून, सुवर्ण पदकची दावेदार उजबेकिस्तानची जिलो बोन सोबत पलकने अंतिम मुकाबला केला. पलकाने तोडीसतोड खेळ केला. भारताकडून पलकला सुवर्ण पदकाची दावेदार मानल्या जात होते. मात्र, रौप्य पदक भारताच्या झोळीत आले. 



टिप्पण्या