Political news-congress- bjp- akola: नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा अकोल्यात विरोध; काँग्रेस- भाजप कार्यकर्ते भिडले, काँग्रेस आंदोलक पोलिसांच्या ताब्यात



ॲड. नीलिमा शिंगणे - जगड 

अकोला :कोरोना काळात काँग्रेसने नागरिकांना कोणतीही मदत केली नाही,असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या वक्तव्याचा काँग्रेसने जोरदार विरोध केला असून,आज सकाळी अकोल्यात भाजप आमदार तथा जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्या निवास समोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांनी या मोर्चाला घराच्या काही अंतरावरच रोखला.



भाजपने दंड थोपटले



काँग्रेसच्या या आंदोलन विरोधात भाजपने देखील दंड थोपटले. याप्रसंगी काँग्रेसचा विरोध करण्यासाठी भाजप कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने एकत्रित आले होते.




काही वेळ तणाव



यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे काही वेळासाठी याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. तसेच या मार्गावरील वाहतूक सुद्धा काही वेळ थांबविण्यात आली होती. दोन्ही पक्ष कडून आक्रमक घोषणाबाजी झाली. यानंतर पोलिसांनी काँग्रेसच्या 50 कार्यकर्त्यांना  ताब्यात घेतले. पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी, या मागणी साठी काँग्रेसने जोर धरला होता.


काँग्रेस जिल्हाध्यक्ष (अकोला)अशोक अमानकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.




……


काँग्रेसची दादागिरी भाजप सहन करणार नाही - आमदार सावरकर



पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेते असून केवळ त्यांच्या लोकप्रियता सहन होत नाही त्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या जनतेविषयी असलेला प्रेम जनतेविषयी असलेली आपुलकी जनतेचा विश्वास यामुळे आपण सत्तेत येऊ शकत नाही. त्यामुळे भाजप द्वेषाने विरोधक नैराश्याच्या भावनेतून खालच्या थराचा राजकारण महाविकास आघाडी व काँग्रेस करत असून भाजपा कार्यकर्ते यांच्या घरावर ,पार्टी कार्यालयावर याला समर्थपणे उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सज्ज असून जनताजनार्दन भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी असल्याचा अनेकदा सिद्ध झाला आहे. त्यामुळे काँग्रेसची दादागिरी  सहन करणार नाही, असा इशारा जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी दिला.



भाजपचे सुरक्षा कवच


काँग्रेसच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीने दिल्यावर आज सकाळी आठ वाजता पासून भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या मित्राच्या निवासस्थानी सुरक्षाकवच उभे करून भाजपा महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या  नेतृत्वाखाली काँग्रेसला चोख उत्तर देण्याची     जय्यत तयारी केली होती. या अनुषंगाने भाजपा महिला आघाडी भारतीय जनता युवा मोर्चा भाजपातील विविध आघाडीचे पदाधिकारी यांनी रणपिसे नगर ते जठारपेठ पर्यंत योग्य नियोजन केले होते. त्यामुळे भाजपा कार्यालयात समोर आंदोलन काँग्रेसला करता आले नाही. तसेच आमदार रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानापासून काँग्रेसला निवडक कार्यकर्त्यांसोबत 1000 फूट अंतरावर आंदोलन करण्याची वेळ आली. यावेळी भाजप कार्यकर्त्यानी दिलेल्या काँग्रेस विरोधी घोषणानी परिसर दुमदुमला.



पोलिस प्रशासनाच्या विनंतीला दिला मान



यानंतर आमदार रणधीर सावरकर व महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या आवाहनानुसार कार्यकर्त्यांनी शांतता ठेवली. 

यावेळी विजय अग्रवाल,सिद्धार्थ शर्मा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्ते सकाळपासून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन गिरीश जोशी यांनी केले. शहराची परिस्थिती व अकोला आमचा आहे त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता भारतीय जनता पक्षाने घेऊन पोलिस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन व जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. यावेळी महापौर अर्चना मसने, अनुप धोत्रे,  माधव मानकर ,अक्षय गंगाखेडकर , संजय जिरापुरे , किशोर मांगटे,  जयंत मसने,गिरिश जोशी , निलेश निनोरे ,डॉ किशोर मालोकार,  चंदा शर्मा, देवाशिष काकड, हरीश काळे,  जान्हवी डोंगरे, आशिष पवित्रकार, बाळ टाले, लाला जोगी, राजू बेले आदी उपस्थित होते.

……





टिप्पण्या