Court-rejects-bail-plea​​-three-accuse: 500 रुपयांच्या नकली नोटा चलनात आणुन फसवणूक करणा-या तीन आरोपींचा जमानत अर्ज न्यायालयाने फेटाळला

                                             file photo



ॲड. नीलिमा शिंगणे- जगड

अकोट (अकोला): ख-या नोटांच्या बदल्यात बनावट नोटा देणे व त्या बनावट नोटा ख-या म्हणुन लोकांना देवुन फसवणुक केल्याचे प्रकरणात तीन आरोपींनी दाखल केलेला जमानत अर्ज  न्यायालयाने नामंजुर केला आहे. 



अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश चकोर बावीसकर यांनी तेल्हारा पोलीस स्टेशनच्या फाईल वरील गुन्हा क्र. 53/2022 भा.द.वी. कलम 489 ब, 489 ई, 420 (34), यामधील अरोपी नं.1 अमीत आत्मराम कटारे, वय वर्ष 27, अरोपी नं.2 अमोल गोविंदा कटारे वय वर्ष 22, दोघेही रा. चिस्ताला ता.मानोरा जि.वाशिम अरोपी नं.3 वैभव चंदू दयाल, वय वर्ष 23. रा.हिरवदरी ता.महागाव, जि.यवतमाळ या तिघांनी तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथील फिर्यादीला ख-या नोटांच्या बदल्यात बनावट नोटा देणे व त्या बनावट नोटा ख-या म्हणुन लोकांना देवुन फसवणुक केल्याचे प्रकरणात वरील तीन्ही आरोपींनी दाखल केलेला जमानत अर्ज नामंजुर केला आहे. 



तीन्ही आरोपींना तेल्हारा पोलीसांनी दि. 2.02.2022 रोजी अटक केली असुन,वरील तीन्ही आरोपी तेव्हापासुन अकोला जिल्हा करागृहात आहेत.




या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की, तीन्ही आरोपींनी जमानत मिळण्याकरीता अर्ज दाखल केल्यानंतर या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजीत देशमुख यांनी न्यायालयात युक्तीवाद केला की, या प्रकरणात फिर्यादी नर्सपुर पंचगव्हाण फाटयाजवळ उभा असताना त्यांचे जवळ एक स्कॉर्पओ गाडी क्र. एम.एच-43 - 776 मधुन तीन व्यक्ती उतरल्या व दुसरी चार चाकी क्रेटा गाडी क्र. एम.एच-03, सी.एस. 2743 मधून एक व्यक्ती उतरली या सर्वांनी फिर्यादी जवळ येवुन त्यापैकी एकाने त्याला 500 रु. दोन नोटा दाखवून त्याचे बदल्यात सुट्टे पैसे मागीतले. तेव्हा फिर्यादीने त्या 500 रु. दोन नोटा घेतल्या व त्यांना सुट्टे पैसे दिले. ते सर्व तिथुन निघणार तेवढयात या नोटा पाहिल्या असता त्यावर भारतीय रिझर्व बँक ऐवजी 'भारतीय बच्चोका बँक' असे दिसले. त्यामुळे फिर्यादीने इतर लोकांच्या मदतीने त्या सर्व चारही लोकांना गाडीसह पकडले व पोलीसांना माहिती दिली.त्यावेळी या प्रकरणातील तपास अधिकारी पो.नि.गणेश कायंदे तेल्हार पो.स्टे. हे पंचगव्हाण फाट्यावर पोलीस ताफ्यासह पोहचले तेव्हा वरील तीन आरोपी व्यतीरीक्त त्यांच्यातील एक व्यक्ती तिथुन पळून गेला. त्यानंतर पोलीसांना वरील तीन्ही आरोपींनी उडवा उडवीची उत्तरे दिली.



पोलीसांनी पंचासमक्ष व फिर्यादीसमक्ष तीन्ही आरोपींची झडती घेतली असता त्यांचे जवळ नगदी ख-या नोटा 500/- रु.च्या एकुण 100 तसेच 4 प्लॉस्टीकमध्ये पॅक केलेले नोटांचे बंडल दिसले. त्यापैकी एक पाकीट पंचासमक्ष उघडून पाहिले असता त्यामध्ये वरच्या दोन्ही बाजुला ख-या एक-एक 500/-रु. नोटा व आत मध्ये भारतीय बच्चो का बँक असे लिहलेल्या एकुण 1200 नोटा दिसल्या. बाकी तीनही बंडलमध्ये याच प्रकारे नोटा दिसुन आल्यात. सदरचे रुपये 500 च्या खोटया नोटांचे ख-या वाटाव्या म्हणुन वरती ख-या नोटा लावलेले 4 बंडल व ख-या नोटांचे 500 रु.चे एक बंडल वर उल्लेखीत व क्रेटा गाडी सर्व 12 लाख रुपयांचा मुद्देमाल पंचा समक्ष तिन्ही आरोपींकडून पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे यांनी जप्त करुन ताब्यात घेतला व त्यानंतर तीन्ही आरोपींना त्यांची नावे विचारुन त्यांना अटक केली व फरार झालेल्या आरोपीचे नाव विजय ठाकुर, रा.खामगाव, जि.बुलढाणा असे वरील तिन्ही आरोपींनी पोलीसांना सांगीतले. 



अशा प्रकारे या सर्व आरोपींनी एकाच इरादयाने खोटया 500/- रु.च्या नोटा ख-या वाटाव्या म्हणुन व या नोटांच्या बंडलवर वरुन व ख-या नोटा लावल्या व या मधील खोट्या नोटा आहे हे माहित असुन ख-या म्हणून दिल्या व त्या बदल्यात सुट्टे म्हणुन ख-या नोटा घेतल्या अशा फिर्यादीवरुन पोलीसांनी चार ही आरोपीं विराद्ध गुन्हा नोंदविला. तसेच या प्रकरणातील फरार आरोपी रिंकु उर्फ विजय ठाकुर,रा.ठाकुरवाडा, बरडे प्लॉट,सती फाईल खामगाव हा फरार असुन याचा शोध घेणे सुरु आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या जप्ती नोटा व वाहने या मधील सखोल तपास सुरु आहे. या व्यतीरीक्त इतरठिकाणी या सर्व आरोपींनी गुन्हे केले काय ? किंवा या बाबत मोठी टोळी असल्याचे निष्पन्न झाल्यास इतर आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करणे बाकी आहे. या अटक आरोपींना जामीन दिल्यास फरार व इतर आरोपी पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे.

तसेच या आरोपींना जामीन दिल्यास या गुन्हाचा योग्य तपास करता येणार नाही कारण या गुन्हयातील एक अरोपी फरार आहे. तसेच या सर्व आरोपींनी केलेला गुन्हा हा देशाची अर्थव्यवस्था व चलन व्यवस्थेला खीळखीळी करण्याचा हा प्रयत्न आहे. व सामान्य लोकांना खोटया नोटा देवुन ख-या नोटा घेवून या प्रकरणात आरोपींनी लोकांची फासवणुक केलेली आहे. या आरोपींना जामीन दिल्यास आरोपी हे साक्षीदार यांचेवर दबाव किंवा बळाचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तपासावर त्याचा परिणाम होईल असा युक्तीवाद सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी वि.सत्र न्यायालयासमोर केला.



सर्व आरोपी तर्फे औरंगाबाद येथील फौजदारी वकील ॲड. मनवर यांनी केला. व दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने वरील तीन्ही आरोपींचा या प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळून लावला.

टिप्पण्या