Akola crime 2022: जुने शहरात देशी दारू जप्त; मुद्देमालसह एक विक्रेता पोलिसांच्या ताब्यात

जप्त केलेला मुद्देमालासह पोलीस पथक



ॲड.नीलिमा शिंगणे - जगड 

अकोला:शिवजयंती पर्वावर शनिवारी जिल्ह्यात दारू विक्री बंद ठेवण्याचे आदेश असताना सुद्धा जुने शहर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या परिसरात खुलेआम अवैध प्रकारे दारूविक्री सुरू होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच छापा टाकून आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले .



याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज 19 फेब्रुवारी रोजी पोस्टे जुने शहर डीबी पथक यांना खात्रीलायक खबर मिळाली की, गोखले स्वा मिल जवळ खुल्या जागेत अवैध रित्या दारूची विक्री सुरू आहे. अश्या खात्रीलायक माहितीवर पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. छापा टाकला असता लखन अशोक गायकवाड (वय 30) हा दारूची विक्री करतांना रंगेहाथ सापडला. आरोपीजवळ देशी दारू 90 ML चे 150 नग(कींमत 5250 रुपयेचे) मिळून आल्याने आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी  कायदा कलम 65 ई  कायदयाचे अन्वये गुन्हा नोंविण्यात आला असून,आरोपीस ताब्यात घेतले.

    

ही कारवाई पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे  यांच्या मार्गदर्शन खाली पोहे. का. बासंबे, पोहेका बहादुरकर, पोहेका अनिल खान, नापोका रतन दंदी, पोका  धनराज बावस्कर, अर्जुन खंडारे यांनी केली.



असा होता आदेश


जिल्ह्यात शनिवार दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजयंती) उत्सव साजरा करण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमित्त जिल्ह्यात मिरवणुकी काढण्यात येतात. याकालावधीत कायद्या व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दारुबंदी कायदा 1949 मधील 142(1) नुसार शनिवार दि. 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले. या आदेशाचा भंग झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता.


टिप्पण्या