Mata-Vaishno-Devi-Yatra-katra: जम्मू-काश्मीर मध्ये बर्फवृष्टी व पाऊस: माता वैष्णवदेवी यात्रेवर परिणाम;भाविक सुरक्षित

Snow and rain in Jammu and Kashmir: Impact on Mata Vaishno Devi Yatra, devotees safe





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: जम्मू मध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम वैष्णव देवी यात्रेवर पडला आहे. आधीच बोचरट थंडी आणि आता गारासह पावसाने हजेरी लावल्याने येथील भाविकांनी दोन्ही ऋतूंचा अनुभव एकत्र अनुभवला. यात्रेत आता भाविक स्वेटर, जॅकेटसह पावसाळी कपडे सुद्धा घालून दर्शनाला जात आहे. माँ वैष्णवदेवी मंदिर असलेल्या डोंगरावर सध्या बर्फ साचलेलं आहे. अकोल्यातील भाविक देखील या यात्रेत सहभागी आहेत. सर्व भाविक सुरक्षित असून बर्फवृष्टी आणि पाऊस अश्या एकत्रित वातावरणाचा मनसोक्त आनंद घेत असल्याचे अकोल्यातील यात्रेकरूंनी सांगितले.



हेलिकॉप्टर सेवा बंद


जोरदार पाऊस आणि धुक्यामुळे सध्या हेलिकॉप्टर सेवा देखील बंद करण्यात आली असून, अर्धकुवारी ते मंदिर पर्यंतच्या नवीन मार्गावर दरड कोसळल्याने बेट्रीकार सेवा सुद्धा बंद करण्यात आली आहे.




संततधार पावसामुळे माता वैष्णोदेवीच्या बाबरी कार मार्गावरील पंछी हेलिपॅडजवळ दरड कोसळली होती. त्यामुळे हा रस्ता भाविकांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.  बॅटरी कार सेवा देखील बंद करण्यात आली आहे.



राष्ट्रीय महामार्ग बंद



जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार बर्फवृष्टी आणि पावसामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद असताना, श्री माता वैष्णो देवी भवन मार्गावर दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे.




 

प्राप्त माहितीनुसार, संततधार पावसामुळे माता वैष्णोदेवीच्या बॅटरी कार रोडवरील  हेलिपॅडजवळ दरड कोसळली होती.  त्यामुळे हा रस्ता भाविकांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.  बॅटरी कार सेवा देखील सध्या स्थगित करण्यात आली आहे.  यात्रेसाठी भाविकांना पारंपरिक मार्गाचा अवलंब करण्यास सांगितले आहे. 



भाविकांनी यात्रा सुरूच ठेवली



श्राइन बोर्ड प्रशासनाचे अधिकारी येथे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे यात्रेकरूंकडून काही सूचना आल्यास लगेच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, सर्व त्रास सहन करूनही भाविकांनी पारंपरिक मार्गाने माँ वैष्णोदेवीची यात्रा सुरूच ठेवली आहे.  



याआधीही ऑगस्ट आणि डिसेंबर मध्ये पावसामुळे माता वैष्णोदेवी मार्गावर दरड कोसळल्याने यात्रा काही काळ थांबवण्यात आली होती.  श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागात टीनचे शेड बांधले असले, तरी पावसाळ्यात यात्रा मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.  आता पारंपरिक सामाईक छताच्या मार्गाने यात्रा सुरळीत करण्यात आली असल्याची माहिती आहे.



जनजीवन विस्कळित


जम्मू-काश्मीरमध्ये ताज्या हिमवृष्टीमुळे सामान्य जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे.  त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. खराब हवामानामुळे सध्या श्रीनगर विमानतळावरून विमाने उडवणे शक्य नाही.  हे लक्षात घेऊन ती पुढे ढकलण्यात आली आहे.  संततधार पाऊस आणि हिमवर्षाव आणि महामार्गासह विविध ठिकाणी दरड कोसळत असल्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग तिसऱ्या दिवशीही वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहिला.



भारतीय जवानांचे कौतूक



उत्तर भारतात थंडी पडत आहे. त्याचवेळी जम्मू-काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे लोक घराबाहेर पडण्यास कचरत आहेत.  कडाक्याच्या थंडीत बर्फवृष्टीमुळे अनेक भागात बर्फाची चादर पसरली आहे.  अशा भीषण वातावरणातही देशाचे जवान जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर सतत गस्त घालत आहेत.

संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क अधिकारी यांनी जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये सैनिकांचे धैर्य आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येतो, ज्यामध्ये कुपवाडामधील नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराची चौकी सुमारे 17 हजार फूट उंचीवर उभी आहे. 





टिप्पण्या