AMC election 2022: निवडणुकीचे वारे: एकजुटीने संघटन वाढवून मनपा निवडणुकीला सामोरे जा!स्वराज्य भवनात महानगर काँग्रेसची आढावा बैठक




 

ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: आगामी अकोला मनपा निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्षाच्या ध्येय धोरणसाठी व्यापक जनअभियान राबवून मनपात काँग्रेसची सत्ता निर्मितीसाठी कार्यरत राहावे, असे आवाहन पक्षाचे जिल्हा प्रभारी किशोर बोरकर यांनी केले. 




अकोला मनपा निवडणुकीच्या संदर्भात स्वराज्य भवनात सोमवारी महानगर काँग्रेसची आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. 



या आढावा बैठकीत महानगरातील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली.महानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या आढावा बैठकीत पक्षाचे जिल्हा प्रभारी किशोर बोरकर, सहप्रभारी जावेद अंसारी, माजी मंत्री अजहर हुसेन, प्रदेश महासचिव बबनराव चौधरी, डॉ जीशान हुसेन, मनपा विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण, माजी महापौर मदन भरगड, जिल्हा कार्याध्यक्ष राजेश भारती,रमाकांत खेतान, विवेक पारस्कर, प्रदीप वखारिया,अनंत बगाडे, अनुजा शहा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 




क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हारार्पणाने या बैठकीस प्रारंभ करण्यात आला.या बैठकीत प्रभारी किशोर बोरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत येणाऱ्या मनपा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता कोणत्याही परिस्थितीत मनपात  आणण्याचे आवाहन करीत कार्यकर्त्यांनी जोमाने कार्याला लागावे. मनपा निवडणुकीच्या संदर्भात चार सदस्यीय समिती गठीत करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 



यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करीत किशोर बोरकर यांचे स्वागत केले. बैठकीत मनपा निवडणुकीच्या संदर्भात आढावा घेण्यात आला. अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करीत सामूहिकतेने मनपावर सत्ता मिळवण्यासाठी आराखडा निर्माण करीत कार्यरत राहावे, असे आवाहन केले. 



डॉ प्रशांत वानखडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून पक्षाचे संघटन जोमाने सशक्त करण्यासाठी महानगर काँग्रेसची फळी कार्यरत असल्याची माहिती यावेळी दिली. संचालन तश्वर पटेल यांनी तर आभार महेंद्र गवई यांनी मानले. 





यावेळी नगरसेवक प्रवीण शिंदे, मो इरफान, पराग कांबळे, मोईन खान मोंटू, जमीरभाई बर्तनवाले, शेख नवेद, मो नौशाद, मो युसूफ, आसिफ खान,आकाश कवडे, आकाश शिरसाट, मकसूद खान, गुड्डू पठाण, मनिष मिश्रा,पंकज देशमुख, सुनील वानखडे, चंद्रकांत सावजी, रहमानबाबू, गणेश वांडे पाटील, संदेश वानखडे, शेख हनीफ, हरीश कटारिया, राजू नाईक, मन्सूर अहमद, शे मेहबूब, सखावत शाह, सै शहजाद, विशाल इंगळे, खिझर नवाब ,मुजाहिद खान, लाला पठान, अफरोज लोधी, शकुर लोधी, शे अब्दुल्ला, गणेश कळसकर, इस्माईल ठेकेदार, नरेंद्र देशमुख, नफिस अहमद,मो अजीम, मो साबीर, शे हैदर, गुलाम नबी समवेत काँग्रेसच्या विविध आघाड्याचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या