vaccine-natural-immune-shield: लसीकरण नव्हे, तर नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीच संरक्षणात्मक ढाल; 10 जानेवारी रोजी ‘मानवी साखळी’ मोहिमेत सहभागी व्हा - प्रकाश पोहरे यांचे आवाहन









ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून, लसीच्या दुष्परिणामाने भावी पिढी निरवंश होणार असल्याचे मत सिटीझन्स फोरमचे प्रकाश पोहरे यांनी मांडले. याचा प्रतिकार करण्यासाठी येत्या २ जानेवारी पासून ‘मानवी साखळी मोहिम’ राबविण्यात येणार असून, या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 


नव्या वर्षात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबरला देशाला संबोधित करतांना केली. सध्याची आणि यापुढील पिढ्या बरबाद करणारी ही घोषणा असल्याचे  प्रकाश पोहरे यांनी म्हटले आहे.




ऋतूमध्ये बदल झाल्यामुळे नियमित येणाऱ्या एका साध्या सर्दी-पडशाच्या आजाराची प्रसारमाध्यमांना हाताशी धरून, त्याचा खोटा बागुलबुवा उभा करून लोकांना भीती दाखवून जनतेला मूर्ख बनवणे ही सरकारी हरामखोरीच असल्याचा घणाघात पोहरे यांनी केला. 



लसीकरण नव्हे, तर नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती ही सगळ्यांच्याच अस्तित्वाच्या लढाईतील संरक्षणात्मक ढाल असून, ते एक प्रभावी असे अस्त्र आहे; परंतु कोविड-१९ साथीचा बागुलबुवा उभा करून नैसर्गिक प्रतिकारशक्तीला मारक ठरणारे एक इंजेक्शन टोचून कृत्रिम रोगप्रतिकारशक्तीवर जगणारी निरवंश पिढी बनविण्याचा घाट घातला जातोय, असेही पोहरे म्हणाले. 



कोरोनाची दिली जाणारी लस प्रमाणीकृत नाही. ही लस घेतल्याने अनेकांना कायमचे अपंगत्व आले असून, काहींचा मृत्यूदेखील झाला आहे. ब्लड क्लोटिंग होऊन मृत्यू झाल्याचे दस्तुरखुद डॉक्टरांचेच निदान आहे. लसीमुळे नपुंसकत्व येईल अशी शंका काही तज्ज्ञांनी तर काही तज्ञानी तश्या धोक्याचा इशारा दिला आहे. नागरिकांवर केवळ प्रयोग केला जात असून, नागरिकांचा 'गिनिपिग'सारखा वापर करण्याचे पातक या सरकारने केले आहे, असेही पोहरे म्हणाले. 



सरकार व अधिकार्‍यांची, पॅथालॉजी लॅब चालक, फार्मा लॉबी, कोरोना सेंटर व लसीकरण केंद्र चालकासोबतची हिस्सेदारी आणि त्यासाठीच फार्मा लॉबीने आधी कोरोना, नंतर डेल्टा आणि आता जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनाच्या 'ओमिक्रॉन व्हेरियंट'चा धोका वाढत असल्याचा बागुलबुवा उभा केला असल्याचा आरोपही पोहरे यांनी केला. 


 

‘मानवी साखळी’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन 


ज्या लोकांचा अश्या लसीकरणाला विरोध असेल अशा लोकांनी सोमवार दि.१० जानेवारी २०२२ ला देशभरातील आपापल्या गावात सकाळी दहा वाजता हातात निषेध फलक घेऊन मानवी साखळी बनवावी आणि याचा निषेध आणि विरोध करावा, असे आवाहन प्रकाश पोहरे यांनी केले. अकोल्याची मानवी साखळी १० जानेवारीला अकोल्यात जठार पेठ चौकापासून सकाळी १० वाजता पासून सुरू करण्याचा विचार असून, जे सामील होवू इच्छितात त्यांनी 98225 93901 या व्हाट्सअप्प क्रमांकावर सहभागी राहणार असल्याचा संदेश पाठवावा, तसेच मोठ्या संख्येने या मोहिमेत सामील व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले.

टिप्पण्या