Special operation by RTO:Akola: आरटीओ कडून विशेष मोहीम: 42 वाहनांवर कारवाई; चार लाखाच्या जवळपास दंड वसूल

Special operation by RTO: action on 42 vehicles;  Nearly four lakh fines were recovered






नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) कडून आज विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये दोन पथक तयार करण्यात आली होती. एका पथकाने शहरी भागातील वाहनांची तपासणी केली; तर दुसऱ्या पथकाने वाशीम बायपास येथे वाहनांची तपासणी तर केलीच परंतु रस्त्यावर लागलेले जड वाहन आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होणाऱ्या ट्रक वर तात्काळ कार्यवाही करून वाशीम बायपास मोकळा करून वाहतुकीस अडथळा निर्माण होणाऱ्या वाहनावर कार्यवाही करण्यात आली.  



42 वाहनांवर कारवाई



शहराच्या विविध भागात आज एकंदरीत 42 वाहनावर कार्यवाही करण्यात आली असून, अंदाजे चार लाखा पर्यंत महसूल वसूल करण्यात आला आहे. 




जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनात मोहीम



ही कार्यवाही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  पथकामध्ये मोटर वाहन निरीक्षक मेश्राम,  टाले आणि दराडे तसेच सहायक मोटर वाहन निरीक्षक सहभागी होते.  



मोहीम सुरूच राहणार




याआधी सुद्धा अशीच मोहीम जिल्हाभर राबविण्यात आली होती. यानंतर सुद्धा ही मोहीम अशीच सुरु राहणार असून, नागरिकानी बाहेर निघताना वाहनांची मुळ कागदपत्रे व शासनाच्या नियमाचे पालन करावे तसेच 2 डिसेंबर 2021 पासून दंडात सुद्धा वाढ झाली असून नागरिकांनी वाहनाचे कागदपत्रे विधिग्राहय ठेवावे व वाहतूक नियमाचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या