नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची बंगळूरू येथे काही समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना घडली. या निषेधार्थ अकोला शहर शिवसेनेच्या वतीने आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास खुले नाट्यगृह चौक गांधी रोड येथे शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनात व पश्चिम शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदवून, कानडी सरकारचा प्रतिकात्मक पुतळाचे दहन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारतासाठी वंदनीय आहेत.त्यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या व महाराजांचा अवमान करणाऱ्या या कानडी सरकारचा निषेध म्हणून कानडी सरकारचा पुतळा दहन करण्यात आला असल्याचे राजेश मिश्रा यांनी याप्रसंगी सांगितले.
यामध्ये प्रामुख्याने अतुल पवनिकर,संतोष अनासाने, तरुण बगेरे,गजानन चव्हाण, मंगेश काळे, सुरेंद्र विसपुते,मंजुषा शेळके, सागर भारुका यांच्यासह अकोला शिवसेना विविध आघाडी,शाखा पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी झाले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा