Panjabrao Deshmukh Jayanti Utsav: डॉ.पंजाबराव देशमुख जयंती उत्सव: शिवाजी महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी…

Dr. Punjabrao Deshmukh Jayanti Utsav: Feast of Cultural Program at Shivaji College ...





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला दि.26: डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त 25 ते 27 डिसेंबर या कालावधीत जयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. जयंती उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भावगीत स्पर्धा, पोस्टर कोलाज स्पर्धा आणि स्किट माईम आणि नृत्य संगीत कार्यक्रम सादर करण्यात आले. 




आंतर महाविद्यालयीन भावगीत स्पर्धा 



कु. संध्या उखळकर आंतर महाविद्यालयीन भावगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. डॉ शिरिष कडू यांच्या 'विठ्ठल नावाचा टाहो....' या भावंगीताने आणि  आणि प्रा हर्षवर्धन मानकर यांनी 'दिल मे एक....' या गजलने सभागृह मंत्रमुग्ध झाले होते. 



15 विद्यार्थ्यांचा सहभाग 


भावगीत स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 15 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.या स्पर्धेत प्रथम क्रमांक- कु सपना बन, सीताबाई महाविद्यालय, अकोला गीत- सांज ये गोकुळीं, द्वितीय- कु रागिणी खोडवे, श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला गीत- मी राधीका, तृतीय- गौरव राऊत, श्री शिवाजी महाविद्यालग, अकोला गीत- या जन्मावर या जगण्यावर उत्तेजनार्थ- कु श्रुती बुदुखले, विदर्भ संगीत ऍकॅडमी, अकोला गीत- गोकुळीं...भावगीत स्पर्धेचे परीक्षण  प्रा डॉ शिरीष कडू, प्रा विनोद देशमुख, प्रा नवलकुमार जाधव,  हार्मोनियमची साथ प्रा हर्षवर्धन मानकर आणि तबलाची साथ सिद्धेश्वर टिब्बर यांनी दिली.

 


पोस्टर आणि कोलाज स्पर्धा


दुपारी “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या थीम अंतर्गत ऑनलाइन “पोस्टर आणि कोलाज स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी एकूण 18 प्रवेशिका नोंदविण्यात आल्या.  . यामध्ये  डॉ. एस.एस. कडू, आणि  डॉ. ए.एम. मोपारी यांनी परीक्षणाचे कार्य पार पाडले. 


खुली प्रश्नमंजुषा स्पर्धा



ऑनलाईन आणि ऑफलाईन खुली प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली यामध्ये समन्वयक म्हणून प्रा नितीन मोहोड, संयोजक प्रा जमीर शेख, प्रा गणेश गायकवाड व संचालन डॉ अस्मिता बढे यांनी केले. 



स्किट माईम व एकपात्री


शेवटच्या सत्रात स्किट माईम व एकपात्री प्रयोग विद्यार्थ्यांनि सादर केले व जयंती उत्सवात रंगत भरली, स्किट माईम व एकपात्री प्रयोगाचे समन्वयक म्हणून डॉ संजय पोहरे यांनी कार्य पार पाडले. 



नृत्य स्पर्धा



डॉ अश्विनी बलोदे यांच्या समनव्ययामध्ये नृत्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध कार्यक्रमात तांत्रिक सहकार्य संगणक विभागाचे प्रा.रुपाली काळे,  प्रा.संतोष चव्हाण, प्रा.वैशाली गुडघे, प्रा. अनिता दुबे आणि प्रा.अनिल भिलकर यांनी विविध कार्यक्रमाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रसारणाकरिता करिता तांत्रिक सहकार्य केले. 









टिप्पण्या