New year 2022-shivlilatai patil: नववर्ष पर्ववर हभप शिवलीलाताई पाटील यांचे अकोला महानगरात प्रबोधनात्मक कीर्तन







ॲड. नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: नववर्षात प्रबोधनात्मक विचार समाजमनात रुजवावे व नागरिकांना महिला कीर्तनकाराची नव्याने ओळख व्हावी, यासाठी सामाजिक सेवाकार्यात सदा सक्रिय असणाऱ्या स्थानीय देशमुख पेठ येथील आई तुळजाभवानी मित्र मंडळ व युवकांच्या बलोपासना साठी सेवारत असणाऱ्या छत्रपती फिटनेस सेंटरच्या वतीने नववर्षाच्या पर्वावर महानगरात राज्यस्तरीय ख्यातिप्राप्त प्रबोधनात्मक महिला कीर्तनकार हभप शिवलिलाताई पाटील यांच्या सुश्राव्य कीर्तनाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा एक दिवसीय कीर्तन सोहळा रविवार दिनांक 2 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क, देशमुख पेठ येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कार्यक्रम आयोजन समितीचे पंकज जायले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 





स्थानिय शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत शिवाजी महाराजांचा ज्वाजल्य स्वराज्य समर्पणाचा इतिहास शिवलीलाताई पाटील यांच्या सुत्राव्य व प्रबोधनात्मक वाणीतून ऐकण्याची पर्वणी मंडळाच्या वतीने साकार करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. 



अकोला महानगरात प्रथमच शिवलीलाताई पाटील या येत आहेत. शिवलीलाताई यांचे कीर्तन म्हणजे कौटुंबिक जीवनातील वेगवेगळे प्रसंग समाजातील वेगवेगळ्या बाबी अधूनमधून विनोदाची पेरणी करत त्या कीर्तनात सादर करीत असतात. त्यांच्या कीर्तनाना राज्यभरातील तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. शिवलीलाताईच्या कीर्तनाची स्वतःची अशी वेगळी शैली आहे. सोशल मीडियावर ही त्यांना मानणारा एक मोठा वर्गही आहे. कमी वेळेत आणि कमी वयात शिवलीला ताईनी आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. 



वयाच्या पाचव्या वर्षापासून कीर्तन


राज्यात कीर्तन म्हटलं म्हणजे फेटे, टाळ मृदुंगने कीर्तन करणारे पुरुष किर्तनकार दिसतात. पण महिला किर्तन करताना क्वचितच पाहिले असेल. त्यामध्ये मूळच्या सोलापूर जिल्हयातील शिवलीलाताई पाटील या एक आहेत. घरातूनच त्यांना किर्तनाचे बाळकडू वडिलांकडून मिळाले. त्यांचे वडील बाळासाहेब पाटील हे कीर्तनकार असून त्यांचे पूर्ण कुटुंब ही वारकरी संप्रदायात आहे. म्हणूनच शिवलीला ताईना लहानपणा पासून कीर्तनाची गोडी निर्माण झाली व अगदी वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी कीर्तन करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 



शिवलीला ताई यांनी महाराष्ट्रातील अनेक गावा खेड्यात कीर्तन केले असून आपली वेगळी परंपरा निर्माण केली आहे.अगदी लहान वयातच एक हजाराहून अधिक कीर्तन केले आहेत. त्या आपल्या कीर्तनातून कौटुंबिक जीवनातील विविध प्रसंग समाजातील इतर गोष्टी, समस्या श्रोत्यांना अगदी मनोरंजकपणे सांगतात व समाजात जागरुकता निर्माण करतात अश्या सामाजिक जनजागृतीसाठी हा लोकोपयोगी व प्रशोधनात्मक उपक्रम मंडळाच्या वतीने साकार करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


शासकीय नियमानुसार कोरोना नियमांचे पालन करीत आयोजित या प्रबोधनात्मक कीतन उत्सवात नागरिकांनी सामाजिक अंतर राखीत सहभागी होऊन कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रम स्थळी गर्दी होवू नये, यासाठी समाज माध्यमातून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे देखील पंकज जायले यांनी सांगितले.



यावेळी आयोजन समितीचे पवन महल्ले, प्रमोद गाठे, रवी हलगे, राम बोंद्रे, संदीप बाथो, सागर तिवारी, राहुल लोहिया समवेत आई तुळजाभवानी मित्र मंडळ व छत्रपती फिटनेस सेंटरचें कार्यकर्त उपस्थित होते.

टिप्पण्या