Mahatma Gandhi- kalicharan maharaj: कालीचरण महाराजला खजुराह येथे अटक; दुपारपर्यंत रायपूर न्यायालयात हजेरी

Kalicharan Maharaj arrested at Khajuraho;  Appearance in Raipur court till noon (photo source-Twitter)





अकोला : छत्तीसगडमधील रायपूर येथे झालेल्या धर्म संसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजचा शोध अखेर संपला असून आज सकाळी मध्य प्रदेश मधील खजुराह शहरातील बागेश्वर खांब येथून रायपूर ( छत्तीसगड) पोलिसांनी अटक केली आहे. दुपारपर्यंत कालीचरण महाराज यांना रायपूर येथे आणले जाणार असून कोर्टासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती रायपूर पोलीस अधीक्षक यांनी प्रसार माध्यमांना दिली.




दरम्यान रायपूर पोलीस कालीचरण महाराजचा शोध घेण्यात संपूर्णपणे व्यस्त होती. कालीचरण महाराजच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन खजुराहो येथे ट्रेस करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी छापा टाकला असता संभाव्य ठिकाणी आढळून आला नव्हता. कालीचरण हा उत्तर प्रदेशात पळून गेल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली होती. परंतु रात्री परत एकदा शोध मोहीम राबवून कालीचरण लपून बसलेल्या बागेश्वरी खांब या ठिकाणाहून पोलिसांनी पकडले.


पाच पथक होती मागी


कालीचरण महाराजला शोधण्यासाठी पोलिसांची पाच पथके नेमण्यात आली होती. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कालीचरणचा शोध घेत होते.  खुजराहोमध्ये कालीचरणचे लोकेशन ट्रेस करूनही तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता, त्यानंतर तो उत्तर प्रदेशात जाण्याची भीती पोलिसांना वाटत होती. पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशला रवाना झाले होते. 


छत्तीसगड राजधानी रायपूरमधील टिकरापारा पोलिस स्टेशनमध्ये कालीचरण महाराज यांच्याविरुद्ध कलम ५०५ (२) (वर्गांमध्ये शत्रुत्व, द्वेष किंवा द्वेष निर्माण करणारी विधाने करणे) तसेच २९४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




अकोला न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज केला खारीज


दरम्यान अकोला (महाराष्ट्र) येथे गांधीवादी तथा काँग्रेस पदाधिकारी प्रशांत गावंडे यांनी कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी,अशी तक्रार सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. कालीचरण महाराज यांनी अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात आपल्या वकिलांच्या मार्फत अंतरिम जामीन अर्ज दाखल केला होता. अकोला न्यायालयाने बुधवारी हा अर्ज खारीज केला.






टिप्पण्या