Inter university boxing-amt-uni: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ पुरुष बॉक्सिंग संघात अकोल्याच्या बॉक्सरांचा सर्वाधिक भरणा; महिला संघातही दबदबा

Sant Gadgebaba Amravati University men's boxing team has the highest number of boxers from Akola




ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: पंजाब जालिंदर मधील लवली युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सिंग स्पर्धेमध्ये अकोला क्रीडा प्रबोधिनी व प्रशिक्षण केंद्राचे 13 बॉक्सर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. स्पर्धा 25 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीत पार पडत आहे. अमरावती विद्यापीठ संघात सर्वाधिक अकोल्यातील बॉक्सरांचा भरणा आहे. यापूर्वी झालेल्या महिला गटाच्या स्पर्धेत देखील अकोला जिल्ह्यातील 10 बॉक्सरचा समावेश होता.



पुरुष संघात 49 किलो वजन गटात नाना पिसाळ सीताबाई कला महाविद्यालय अकोला, 51 किलो वजन गटात अजय पेंदोर संत गजानन महाराज कॉलेज बोरगाव मंजू, 54 किलो वजन गटात शिवाजी गेडाम संत गजानन महाराज कॉलेज बोरगाव मंजू ,57 किलो वजन गटात अजहर अली सरस्वती आर्ट्स कॉलेज दहीहंडा अकोला, 60 किलो वजन गटात हरिवंश टावरी शिवाजी महाविद्यालय अकोला, 53 किलो वजन गटात  विशाल  नुपे संत गजानन महाराज बोरगाव मंजू अकोला, ६७ किलो वजन गटात माणिक सिंह मांगीलाल शर्मा कॉलेज अकोला ,71 किलो वजन गटात मोहम्मद राहिल शिवाजी इंजीनियरिंग कॉलेज अकोला ,75 किलो वजन गटात सचिन चव्हाण संत गजानन महाराज कॉलेज बोरगाव मंजू अकोला ,80 किलो वजन गटात क्षितिज तिवारी आर एल टी सायन्स कॉलेज अकोला, 80 किलो वजन गटात कृष्णा लोखंडे शंकरलाल खंडेलवाल कॉले ज अकोला, 92 किलो वजन गटात सुदर्शन  येनकर शिवाजी कॉलेज अकोला, 92 किलोच्यावर वजन गटात शुभम चौधरी शिवाजी कॉलेज अकोला यांचा समावेश आहे. 




स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर शिवाजी कॉलेज अकोलाच्या वतीने  प्रा संजय काळे यांच्या नेतृत्वात घेण्यात आले.   



विद्यापीठ प्रमुख (बॉक्सिंग) प्रा. गजानन वडे प्रा.अविनाश असनारे व क्रीडा विभाग उपसंचालक विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. सर्व खेळाडू राज्य क्रीडा मार्गदर्शक (बॉक्सिंग) सतीशचंद्र भट यांच्या मार्गदर्शनात वसंत देसाई क्रीडांगण येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहे.



10 महिला बॉक्सर विद्यापीठ संघात



ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धा पंजाब राज्यातील जालंधर येथे  17 ते 21 डिसेंबर या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधनी व वसंत देसाई क्रीडांगणातील बॉक्सिंग केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या 10 महिला खेळाडूंनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व केले. 


यामध्ये स्थानिक शिवाजी महाविद्यालयाची दीक्षा गवई 48 किलो वजन गट, दिव्या तायडे 51 किलो वजन गट, दिया बचे 52 किलो वजन गटात, बार्शीटाकळी येथील जीएनए महाविद्यालयाची गौरी जयसिंगपुरे 54 किलो वजन गटात, मूर्तिजापूर येथील गाडगे महाराज विद्यालयातील पूनम कैथवास 60 किलो वजन गट, दीक्षा गोलाईत 63 किलो वजन गट, विधी रावल 70 किलो, दिव्यानी जंजाळ 75 किलो, रिया ताराम 81 किलो वजन गटात सहभागी झाल्या होत्या. 

टिप्पण्या

  1. सर्व बाँक्सरांना हार्दिक शुभेच्छा.... अनंत आशिर्वाद.... विजयी भव......

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा