Indian railway:nanded express: फिरोझपूर शेतकरी आंदोलनाचा काही रेल्वे गाड्यांवर परिणाम: नांदेड अमृतसर एक्सप्रेस रद्द

Impact of Ferozepur farmers' agitation on operation of some trains: Nanded Amritsar Express canceled





अकोला: उत्तर रेल्वेने कळविल्यानुसार पंजाब मधील फिरोझपूर रेल्वे विभागात शेतकरी आंदोलनामुळे काही रेल्वे गाड्यांच्या परीचालनावर परिणाम झाला आहे. यामुळे नांदेड रेल्वे विभागात धावणाऱ्या काही गाड्यांवर परिणाम झाला असून, अमृतसर ते हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस, हुजूर साहिब नांदेड ते अमृतसर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाने  दिली आहे.



रद्द करण्यात आलेल्या गाड्या :


१. दिनांक २०.१२.२०२१ रोजी अमृतसर येथून सुटणारी गाडी संख्या १२४२२ अमृतसर ते हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस (अकोला-वाशीम-हिंगोली मार्गे जाणारी) रद्द करण्यात आली आहे. 



२. दिनांक २२.१२.२०२१ रोजी हुजूर साहिब नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या १२४२१ हुजूर साहिब नांदेड ते अमृतसर एक्स्प्रेस (हिंगोली-वाशीम-अकोला मार्गे जाणारी) रद्द करण्यात आली आहे. 



प्रस्थान बदललेल्या गाड्या :


गाडी संख्या १२७१६ अमृतसर-हुजूर साहिब नांदेड सचखंड एक्स्प्रेस दिनांक २१.१२.२०२१ रोजी अमृतसर ऐवजी चंदिगढ येथून सुटेल. अमृतसर ते चंदिगढ दरम्यान अंशतः रद्द असेल,अशी माहिती  नांदेड रेल्वे विभागाने दिली आहे.





टिप्पण्या