helicopter crashes in Tamil Nadu: तामिळनाडूमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी घटना; चार ठार

Army helicopter crashes in Tamil Nadu (photo source:Twitter)





नवी दिल्ली : तामिळनाडूमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली.  घटनेची माहिती इंडियन एअर फोर्स ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून दिली आहे. 






हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना जवळच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.  



केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत दुःख व्यक्त केले आहे. तर भारतीय हवाई दलाने अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपासाचे आदेश दिले आहेत.




आतापर्यंत अपघातस्थळावरून चार मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. तसेच तीन जखमींना वाचवण्यात यश आले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मृतकांची नावे वृत्त लिहेस्तोवर कळली नाही.




अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. यामध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नाईक गुरसेवक सिंग, नाईक जितेंद्र कुमार, लान्स नाईक विवेक कुमार, लान्स नाईक बी साई तेजा आणि हवालदार सतपाल यांचा समावेश असल्याचे समजते.




टिप्पण्या