helicopter crash: Bipin Rawat: तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटना:सीडीएस बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी

Tamil Nadu helicopter crash: 13 killed, including CDS Bipin Rawat confirmed





नवी दिल्ली : तामिळनाडूमध्ये लष्कराचे एमआय हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह वरिष्ठ लष्करी अधिकारी होते.  हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. याबाबत इंडियन एअर फोर्स ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल द्वारा माहिती दिली. 



दरम्यान, डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटणार असल्याची माहिती आहे.  गुरुवारी संसदेत क्रॅश झालेल्या लष्करी हेलिकॉप्टर Mi-17 V5 ची माहिती सरकार देणार आहे. याशिवाय भारतीय हवाई दलाने अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपासाचे आदेश दिले आहेत.





भारतीय वायुसेनेने ट्विट केले आहे की, या दुर्दैवी अपघातात जनरल बिपिन रावत, मधुलिका रावत आणि जहाजावरील अन्य 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याचे अत्यंत खेद वाटते.



विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान हे अपघातग्रस्त लष्करी हेलिकॉप्टर Mi-17 V5 चे पायलट होते.  ते 109 हेलिकॉप्टर 

युनिटचे कमांडिंग ऑफिसर आहेत.



तामिळनाडूमध्ये क्रॅश झालेल्या Mi-17 V5 लष्करी हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 13 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे.  डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवली जाईल, असेही सांगण्यात येत आहे.



तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी एक निवेदन जारी करून अपघाताची माहिती घेण्यासाठी अपघातस्थळी भेट देणार असल्याचे म्हटले आहे.  स्थानिक प्रशासनाला बचाव कार्यात सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.



गुरुवारी संसदेत क्रॅश झालेल्या लष्करी हेलिकॉप्टर Mi-17 V5 ची माहिती सरकार देणार आहे.  अपघात झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपिन रावत हे होते.



संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नवी दिल्लीत सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या घरी पोहोचले होते.  कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर काही वेळ थांबल्यानंतर संरक्षणमंत्री तेथून निघून गेले.



कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.  अपघाताबाबत अधिक माहिती गोळा करत असल्याचे त्यांनी सांगितले.  आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सीडीएस जनरल बिपिन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



तामिळनाडूचे वनमंत्री के रामचंद्रन घटनास्थळी पोहोचले होते.  हेलिकॉप्टरमधील १४ जणांपैकी ५ जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले होते. अन्य दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.



सीडीएस बिपिन रावत, त्यांचे कर्मचारी आणि काही कुटुंबीय तामिळनाडूतील कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान कोसळलेल्या लष्कराच्या एमआय-सीरीज हेलिकॉप्टरमध्ये होते.  खराब हवामान हे अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.  सीडीएस बिपिन रावत आपल्या पत्नीसोबत वेलिंग्टनमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते, त्यादरम्यान हा अपघात झाला.

टिप्पण्या