Election 2021:akl-bul-washim: शासकीय गोदामात मतमोजणीची रंगीत तालीम




अकोला,दि.13: विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक 2021 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवार 14 रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरु होणार आहे. त्याअनुषंगाने मतमोजणीची रंगीत तालीम आज घेण्यात आले. मतमोजणीकरीता नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी आपले काम चोख पार पाडा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.




मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी याकरीता रंगीत तालीमचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय गोदामात करण्यात आले. यावेळी मतदार संघातील सर्व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी  व प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 



या प्रशिक्षणास निवासी उपजिल्हाधिकारी अकोला संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वाशिम शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी बुलडाणा दिनेश गिते,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण,  उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे, गजानन सुरंजे, प्रांताधिकारी बाळापूर रामेश्वर पुरी, मुर्तिजापूर अभयसिंह मोहिते पाटील, अकोला डॉ. निलेश अपार तसेच सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


 

या रंगीत तालीममध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना  मतमोजणी प्रक्रिया, मतमोजणी केंद्रावरील रचना, नियुक्त केलेल्या प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्ये, मतमोजणीचे नियोजन व कार्यपद्धती तसेच वैध, अवैध मतपत्रिकाबाबतची माहिती देण्यात आली. मतमोजणी पारदर्शक व चोख पार पडावी यांची सर्वानी दक्षता घ्यावी, असे सूचना  निवासी उपजिल्हाधिकारी  संजय खडसे यांनी केले. तसेच मतमोजणी पाच टेबलावर होणार असून प्रत्येक टेबलावर पाच फेऱ्यामध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडेल, अशीही माहिती दिली.






टिप्पण्या