Christmas gift to Akolekar:Akl: अकोलेकरांना महापालिकेची ख्रिसमस भेट: अनेक वर्षांपासून रखडलेले नेकलेस रोडवरील पथदिवे ख्रिसमसला झगमगले

नेकलेस रोडवर ख्रिस्तमसला झगमगाट: पथदिवे झाले सुरू




अकोल्यात ख्रिस्तमस हर्षउल्हासात साजरा: 2 जानेवारी पर्यंत घरोघरी प्रभू येशू जन्मोत्सव 







ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: अनेक वर्षांपासून रखडलेले नेकलेस रोडवरील पथदिवे शेवटी शनिवारी ख्रिसमसच्या दिवशी जगमगावले.अकोला शहराची शान असलेला नेकलेस रोड हा अनेक वर्षांपासून अंधारात होता. या रस्त्याचे काम अनेक महिने उलटून झाले असले तरी पथदिवे सुरू करण्यात आले नव्हते. अंधारामुळे या रस्त्यावर अनेक अपघात सुद्धा झाले आहेत.



अनेक दिवसांपासून पथदिव्याचे काम सुरू होते शेवटी शनिवारी हे सुरू झाल्याने दिवाळी सारखा अनुभव या मार्गावरील नागरिकांनी घेतला. ख्रिस्तमसच्या दिवशी महापालिका प्रशासनाने सांताक्लाज रूपाने अनोखे गिफ्ट दिले असल्याच्या प्रतिक्रिया अकोलेकरांनी दिल्या.




प्रभू येशूंची प्रेम, बंधूभाव, त्यागाची शिकवण आचरणात आणा - रेव्हरंड निलेश अघमकर



 

प्रभू येशू खिस्तांनी दिलेली प्रेम, बंधुभाव आणि त्यागाची शिकवण आचरणात आणा, येशू हे जगात सेवा करण्यासाठी आले होते, त्यांची ही सेवा भावना आपल्या मनात रुजू द्या, असे आवाहन रेव्हरंड निलेश अघमकर यांनी शनिवारी येथे केले. प्रभू येशू ख्रिस्त जन्मदिवसा निमित्त खदान खिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्च येथे आयोजित प्रार्थना सभेमध्ये ते बोलत होते. 



आकर्षक रोषणाई



25 डिसेंबर रोजी ख्रिस्तमस अर्थात नाताळ हा सण जगभरात साजरा केला जातो. अकोला शहर आणि जिल्ह्यातही शनिवारी येशू खिस्तांचा जन्मदिवस अर्थात नाताळ हा सण मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. यावेळी खिश्चन बंधू - भगिनींनी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन केले. खिसमसनिमित्त सुमारे 160 वर्षांचा इतिहास असणारी अकोल्यातील एकमेव खिश्चन कॉलनी घरांना करण्यात आलेल्या रंगरंगोटी आणि रोषणाईने झगमगून आणि उजळून निघाली आहे. शहरात खिश्चन धर्मियांच्या धार्मिकस्थळांची म्हणजेच चर्चची देखील सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे. विविध ठिकाणी खिसमस ट्री आणून त्यांच्यावर रोषणाई करण्यात आली आहे. अनेक चर्चेसमध्ये येशूच्या जन्माचे देखावे सादर करण्यात आले आहेत. 



24 डिसेंबरच्या रात्री खिश्चन अबालवृद्धांनी विविध चर्चेसद्वारे आयोजित क्यारल पार्टीमध्ये सहभागी होऊन रात्रभर घरोघरी भेटी देऊन खिस्तजन्माची गीते गायिली आणि एकमेकांना खिस्तजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. सांताक्लॉजच्या वेषातील युवक - युवती यावेळी सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. शनिवार, २५ डिसेंबर रोजी सकाळी सर्वच चर्चेसमधून प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले होते. खिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चमध्ये रेव्हरंड निलेश अघमकर यांनी खिसमसचा संदेश दिला. इतरही चर्चेसमधून धर्मगुरुंनी खिस्तजन्मावर आधारित संदेश दिले. सध्या जगातील संघर्ष आणि अराजकतेची परिस्थिती पाहता जगाला प्रभू येशूने दिलेल्या शांती, प्रेम, बंधुभाव आणि त्याग यासंदर्भातील शिकवण आचरणात आणण्याची गरज असल्याचे अघमकर यांनी सांगितले. येशू या जगात शांती, प्रेम, सद्भाव आणि सेवा याची पेरणी करण्यासाठी आले होते, त्यांच्या या विचारांना आज आचरणात आणण्याची गरज असल्याचे त्यांनी पवित्र बायबल मधील विविध वचने यांचा संदर्भ देऊन सांगितले. चर्चेसमध्ये यावेळी संडेस्कुल, महिला संघ, तरुण संघ यांनी ख्रिस्त जन्मावर आधारित गीते सादर केली. तसेच एका बाळाचे समर्पण देखील करण्यात आले.



ख्रिस्त जयंतीचा आनंदोत्सव



आता येथून पुढे आठ दिवस सर्वत्र  ख्रिस्तजयंतीचा आनंदोत्सव साजरा करण्यात येईल. त्यामध्ये ख्रिस्त जन्मावर आधारित नाटिका, लहान मुले, महिला आणि पुरुषांसाठी विविध खेळ स्पर्धा, एखाद्या प्रेक्षणीय स्थळी सहल असे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. 30 डिसेंबरच्या रात्री किंवा 1 जानेवारीला प्रार्थना सभेनंतर अनेक चर्चेसमधून चर्च सदस्यांसाठी सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. 31 डिसेंबरच्या रात्रीही पुन्हा वॉच नाईटचे आयोजन केले जाते. क्यारोल पार्टी घरोघरी जाऊन नववर्षस्वागताची गीते सादर करतात.1 जानेवारी हा नववर्षदिनही खिश्चन धर्मीय एखाद्या सणाप्रमाणेच साजरा करतात. अशाप्रकारे २४ डिसेंबरपासून नवीन वर्षापर्यंत खिश्चन धर्मिय नाताळाचा आनंदोत्सव साजरा करतात.   






आकर्षक देखावा: बदललेला काळ



स्टिफन अगस्तीन आणि त्यांच्या पत्नी रेनिटा यांनी ख्रिसमस निमित्त तयार केलेला देखावा यात त्यांनी येशू ख्रिस्त जन्मला आले तेंव्हाचा काळ आणि बदललेला आजचा काळ त्यांनी दाखवला आहे.







खिश्चन कॉलनीत झगमगाट!


ख्रिस्ती धर्मियांच्या पवित्र नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध चर्चमध्ये तसेच घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नाताळासाठी अकोल्याची बाजारपेठ सजली असून, 160 वर्षांचा इतिहास असणारी अकोल्यातील ख्रिश्चन कॉलनीदेखील आकाशदिवे, कंदील, रेगीबेरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहे.

 


या सणाच्या निमित्ताने सजवले जाणारे ख्रिसमस ट्री, सॅन्ताक्लॉजचे कपडे, गिफ्ट याचे लहानांसोबतच मोठ्यांनाही आकर्षण असते. आजही पालक लहान मुलांच्या उशाला त्यांचे आवडते गिफ्ट ठेवतात आणि सॅन्ताक्लॉजच्या आठवणीत लहान मुले रंगून जातात. 



बाजारपेठ सजली



शहरातील सर्व चर्चेसना आणि घरांना रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर नाताळ आणि येशू जन्मोत्सव निम्मित बाजारपेठ देखील सजली आहे. शहरातील गांधीरोडवरील बाजारपेठेत लहान मोठ्या आकाराचे ख्रिसमस ट्री, जिंगलबेल्स, चांदण्या, सांताक्लॉजचे शर्ट, शुभेच्छापत्रे, सांताक्लॉज टोपी, कपडे, चॉकलेटस, केकस, कॅडबरी, सजावटीचे साहित्य, रंगीबेरंगी मेणबत्या आणि डिझायनर जिंगल बेल्स उपलब्ध आहेत. खरेदीसाठी ख्रिस्ती बांधवांची झुंबड उडाली असल्याचे दिसून आली. यादिवशी केकही कापले जात असल्याने बेकरीमध्ये विविध फ्लेवरमधील व विविध आकारातील साधे केक, पेस्ट्री केक सजविले होते. गेल्या आठवड्यापासूनच ख्रिस्ती लोकांच्या नाताळ सणाची तयारी सुरू झाली होती. 



ख्रिश्चन कॉलनीतील घरांना आणि चर्चेसना रंगरंगोटी करण्यात आली. त्यामुळे ख्रिश्चन कॉलनी सध्या प्रकाशाने उजळून निघाली आहे. या सणानिमित्त अकोल्यातील प्रमुख आठ चर्चेस आणि जिल्हाभरातील मिळून सर्व सुमारे 30 चर्चेसमध्ये दोन जानेवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच सहलीचे देखील आयोजन केले आहे. गुरूवार, 23 आणि शुक्रवार, 24 डिसेंबरला सायंकाळपासूनच या सर्व चर्चेसमधून कॅरोल पार्टीचे आयोजन केले होते, यामध्ये सहभागी होऊन शेकडो अबालवद्ध घरोघरी जाऊन ख्रिस्तजन्माची गीते सादर केले. 



शनिवार, 25 डिसेंबरला सर्व चर्चेसमधून सकाळी ख्रिसमसनिमित्त प्रार्थनासभा झाल्या. आता आठवडाभर विविध कार्यक्रमांची रेलचेल राहील. पुन्हा 31 डिसेंबरला रात्री कॅरोल पार्टीद्वारे घरोघरी जाऊन नवीन वर्षाच्या स्वागताची गीते सादर केली जातील. गेल्यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने नाताळ सण साजरा करण्यात अडचणी आल्या होत्या. व्हॉटसअप आणि फेसबुकवरून सर्वत्र प्रार्थनासभा आयोजित करण्यात आल्या होत्या परंतु आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्याने शासनाने निर्बंध शिथील केल्याने येत्या 2 जानेवारीपर्यंत ख्रिश्चन धर्मीय कोरोनाचे सर्व नियम पाळून नाताळ आणि नववर्षाचा आनंद साजरा करतील.



दरम्यान, ख्रिश्चन कॉलनीमध्ये अबालवृद्ध एकत्र येवून ख्रिस्तजन्माची गाणी म्हणत आहेत. विविध चर्चेसमधील कॅरोल पार्टी घरोघरी जावून प्रभू येशूंच्या जन्माची गीते अगदी नाचून, गाऊन सादर करीत आहेत सोबतच नाताळ व नवीन वर्षाच्या शुभेच्छाही देत आहेत. 




टिप्पण्या