book publication: Charitable: खताळ चॅरिटेबल ट्रस्टच्या आदर्श सचित्र दर्शिका पुस्तकाचे प्रकाश पोहरे यांच्या हस्ते विमोचन







अकोला: जिल्ह्यात सन 2009 पासून सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविणाऱ्या स्थानीय खताळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नुकतीच आदर्श सचित्र दर्शिका ही जिल्ह्याची परिपूर्ण माहिती असणारी पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कान्हेरी येथील वेदनंदिनी येथे आयोजित किसान ब्रिग्रेडच्या  सभेत मोठ्या थाटात संपन्न झाला. 



किसान ब्रिगेडचे अध्यक्ष,ज्येष्ठ शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी या पुस्तकाचे विमोचन केले. तसेच प्राचार्य डॉ. दे.अ. इथापे लिखित क्रांतीवीर देविदास गरड व खताळ गौरवांक या दोन पुस्तकांचा वितरण कार्यक्रम संपन्न झाला. ट्रस्टच्या वतीने अकोला जिल्ह्याची इत्यंभूत माहिती असणारी अकोला दर्शन व माझा भारत महान हे पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. या प्रकाशन सोहळ्यात खताळ चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, सर्वोदय मित्र, मनपाचे माजी सहआयुक्त दत्तात्रय खताळ उपस्थित होते. 



खताळ यांनी यावेळी हे निसर्ग राजा तूच सर्वशक्तिमान हे काव्य गीत सादर केले. या काव्य गीताची यावेळी वाहवा करण्यात आली. आपल्या मनोगतात दत्तात्रय खताळ यांनी हा उपक्रम आपल्या जीवनातील एक भव्यदिव्य उपक्रम असल्याचे मनोगत व्यक्त करीत उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी व्यवसायिक कृष्णा साव, समाजसेवी सलीम सिद्दिकी उपस्थित होते. अशी माहिती आर्कि. महेंद्र खताळ यांनी दिली.

टिप्पण्या