Youth-arrested-carrying-pistol- illegally-Telhara-Akola-crime: तेल्हारातील इंदिरा नगर येथे अवैधरित्या पिस्टल बाळगणा-या युवकास अटक

Youth arrested for carrying pistol illegally in Telhara






अकोला: तेल्हारा शहरात आज सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान ठाणेदार ज्ञानोबा फड  हे सहका-यासह गस्तीवर (पट्रोलिंग) असताना इंदिरा नगर येथे एका युवक अवैधरित्या देशी कट्टा (पिस्टल) असल्याची गुप्त मिळाली.यानुसार झाडाझडती केली असता युवकाच्या घरातून पिस्टल मिळाली असून,युवकास पोलिसांनी मुद्देमाल सह अटक केली आहे. 




लोखंडी धातुचा देशी कटटा जप्त



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंदीरा नगर, तेल्हारा येथील संतोष रमेश ढाळे वय २९ वर्ष रा. इंदीरा नगर तेल्हारा ता. तेल्हारा जिल्हा अकोला हा त्याचे राहते घरात देशी कट्टा पिस्टल बाळगुन आहे, अशी माहिती वरून पंचासमक्ष इंदीरा नगर तेल्हारा येथे संतोष रमेश ढाळे याचे घरी जावुन त्याचे घराची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे घरातुन एक लोखंडी धातुचा देशी कटटा (पिस्टल, अग्नीशस्त्र) त्याला ब्राउन रंगाचे फायबर ची उभ्या लाईनची पिस्टल ग्रीप असलेला किंमत अंदाजे २५,०००/- रू चा मुददेमाल जप्त करून ताब्यात घेतले. 




आरोपी  संतोष रमेश ढाळे याने एखादा शरीराविरुद्धचा गुन्हा करण्याच्या उददेशाने तथा लोकां मध्ये दहशत निर्माण करण्याच्या उददेशाने विना परवाना अवैध रित्या देशी कटटा (पिस्टल, अग्नीशस्त्र) घरात बाळगतांना मिळुन आल्याने कलम ३. २५ आर्म अक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




ही कार्यवाही  पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधिक्षक  मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी रितु खोखर  उप विभाग अकोट, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक  ज्ञानोबा फड व त्यांचे सहकारी गणेश सोळंके, अनिल सिरसाट, जयेश शिनगारे,  निकेश सोळंके यांनी केली. पुढील तपास ठाणेदार फड करत आहेत.



टिप्पण्या