- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
soybean cotton:agitation:Farmer: नवाब मलिक यांनी आर्यन खान, समीर वानखडे व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही पत्रकार परिषद घ्यावी- रविकांत तुपकर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावरही साधला निशाणा
*सोयाबीन-कापूस उत्पादकांसाठी 12 नोव्हेंबर पासून तीव्र आंदोलन -रविकांत तुपकर
ॲड.नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: नवाब मलिक यांनी आर्यन खान आणि समीर वानखडे यांच्या व्यतिरिक्त कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा पत्रकार परिषद घ्यावी, अशी खोचक टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली.
स्थानिक शासकिय विश्रामगृह येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापूस (soybean cotton) आंदोलन व्यतिरिक्त सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरणावर देखील टीका टिपण्णी केली. यावेळी ते बोलत होते.
सोयाबीन-कापूस आंदोलनच्या पार्श्वभूमीवर अकोला येथे 'स्वाभिमानी' च्या प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक. तसेच पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी रविकांत तुपकर यांचे आज अकोला येथे आगमन झाले होते.
12 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात येणाऱ्या सोयाबीन-कापूस व संत्रा उत्पादकांच्या आंदोलनाबाबत पत्रकार परिषदेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सविस्तर भूमिका स्पष्ट केली. 11 नोव्हेंबरपर्यंत जर केंद्र सरकारने सोयाबीनची आयात थांबवली नाहीतर 12 नोव्हेंबर पासून शेतकरी रस्त्यावर उतरतील. सोयाबीन कापूस संत्रा उत्पादकांचे हे आंदोलन जिल्ह्यात ताकदीने उभे राहिल, असा विश्वास तुपकर यांनी व्यक्त केला.
केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांचं जर विमा कंपनी ऐकत नसेल तर त्यांनी राजीनामे द्यावे. विमा कंपनी अधिकारी व राजकीय नेत्यांनी जर शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही तर आम्ही त्यांची गचांडी धरल्याशिवाय राहणार नाही, असे देखील तुपकर म्हणाले.
शेतकऱ्यांची वीज कापल्यास तुमचे ही प्रकरण आम्ही बाहेर काढू अश्या शब्दात ऊर्जा मंत्री नितीन राऊतांना रविकांत तुपकर यांनी यावेळी इशारा दिला. नितीन राऊत कोणत्या उद्योगपतीचे विमान वापरतात हे देखील बाहेर आणू, असे देखील तुपकर यावेळी बोलले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या विरोधात उस्मानाबाद येथे राष्ट्रवादीच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. तर उस्मानाबाद येथील एस पी शुगरचे चेअरमन तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते खंडणीखोर असल्याचा आरोप यावेळी केला होता, याचे उत्तर देतांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांना खालच्या भाषेत बोलल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 'स्टाईल मे' उत्तर देण्यात येईल, असा इशारा आंदोलकांना केला. तर शेतकऱ्यांची एफआरसी लुबाडून कारखाने उभारलेल्यांनी दुसऱ्यांवर आरोप करू नये, असा उपरोधक सल्ला देखील तुपकर यांनी दिला.
विदर्भातील शेतकरी एकत्र येऊ शकत नाही, असे इतरांना वाटते. मात्र बुलडाणा आंदोलनाने हे सिद्ध करून दाखवले की, विदर्भातील शेतकरी एकजुटीने आणि ताकदीने अन्यायविरुद्ध उभे राहू शकतात, असे तुपकर म्हणाले.
शेतकऱ्यांचे पैसे देताना सरकारच्या तिजोरी नेहमीच रिकाम्या असतात. राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे जर पैसे नाही तर आमदार खासदार मंत्र्यांचे पगार कसे निघतात, असा सवाल देखील तुपकर यांनी यावेळी उपस्थित केला.
शेतकरी आंदोलन
aryan khan
farmers
nawab malik
Nitin Raut
press conference
Ravikant Tupkar
Sameer Wankhade
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा