- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
help to orphanages on behalf of the Red Cross Society
अकोला : समाजातील निराधार, अनाथ आणि गरजू बालकांसाठी औषधी, पौष्टिक आहार व हायजिन किट सारख्या आवश्यक वस्तू रेडक्रॉस सोसायटी च्या वतीने आज शहरातील विविध अनाथालयांना देण्यात आल्या. त्यांनी केलेली ही मोलाची मदत अनुकरणीय आहे असे मत अकोला महानगरपालिकेच्या आयुक्त कविता द्विवेदी (भा.प्र.से.) यांनी व्यक्त केले. त्या या साहित्य वाटप कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
देशाचे भावी आधारस्तंभ असणाऱ्या अशा बालकांसाठी रेडक्रॉस सोसायटी प्रमाणेच इतरही संस्था पुढाकार घेतात ही बाबही स्तुत्य असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
सूर्योदय बालगृह मलकापूर येथे आयोजित एका छोटेखानी समारंभात बोलताना कविता द्विवेदी यांनी समाधान व्यक्त केले व रेडक्रॉस वेळोवेळी करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले .
कार्यक्रमात सूर्योदयसह उत्कर्ष बालगृह, गायत्री बालिका गृह, आणि आनंद आश्रम या संस्थाच्या प्रतिनिधींना दैनंदिन उपयोगी वस्तू, हाईजिन किट व औषधीचे वितरण करण्यात आले.
प्रारंभी सूर्योदय संस्थेच्या अध्यक्ष प्रतिभा देशमुख व रेडक्रॉस सोसायटीचे एडवोकेट महेंद्र साहू , प्रशांत राठी यांनी आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रतिभा देशमुख यांनी सूर्योदय संस्थे विषयी तर अमर गौड यांनी रेड क्रॉसच्या उपक्रमाची माहिती दिली.
अरुंधती शिरसाट यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी आनंदाश्रमचे नीरज आवंडेकर, सूर्योदयचे प्रशांत देशमुख व जितेंद्र तिवारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा