Indian Railway-south-central zone- Akola-Purna-Parali- Akot: अकोला-पूर्णा,अकोला-परळी एक्सप्रेस 21 पासून पूर्ववत धावणार: या गाड्या अकोट पर्यंत वाढवाव्यात-संजय खडक्कार

Akola-Purna, Akola-Parli Express will run again from 21: these trains should be extended to Akot-Sanjay Khadakkar





अकोलाअकोला ते पूर्णा व अकोला ते परळी दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्या 21 नोव्हेंबर पासून पुन्हा पूर्ववत धावणार आहे. या गाड्यांचा पॅसेंजर दर्जा समाप्त करण्यात आला असून,आता या गाड्या विशेष एक्सप्रेस म्हणून नियमित धावणार आहेत. या गाड्यांमध्ये अनारक्षित तिकिटावर प्रवास करता येणार असल्याचे दक्षिण-मध्य रेल्वेने म्हंटले आहे.



07600 परळी अकोला ही गाडी 21 नोव्हेंबर पासून दररोज परळी स्थानकावरून 13:15 वाजता प्रस्थान करून अकोला येथे 21:05 वाजता येणार आहे. 07774 अकोला परळी ही गाडी 22 नोव्हेंबर पासून दररोज अकोला स्थानकावरून 14:15 वाजता प्रस्थान करून परळी स्थानकावर 22:25  वाजता पोहोचणार आहे. 07773 पूर्णा अकोला  ही गाडी 22 नोव्हेंबर पासून दररोज पूर्णा स्थानकावरून सात वाजता रवाना होऊन, अकोला स्थानकावर 12:30 वाजता येणार आहे. 078 55 अकोला पूर्णा ही गाडी 24 नोव्हेंबर पासून अकोला स्थानकावरून सहा वाजता रवाना होऊन पूर्णा स्थानकावर 10:50 वाजता पोहोचणार आहे. 0 7 5 73 अकोला पूर्णा ही गाडी 21 नोव्हेंबर पासून दररोज अकोला स्थानकावरून 22:15 वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी दोन वाजता पूर्णा स्थानकावर पोहोचणार आहे. 07574  पूर्णा अकोला ही गाडी 23 नोव्हेंबर पासून दररोज पूर्णा स्थानकावरून 23: 50 वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी 03:40 वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. या गाड्यांमध्ये जनरल द्वितीय श्रेणी दर्जाचे डबे असणार असून तिकीटही सामान्य असणार आहे.





भुसावळ-बडनेरा


ट्रेन क्रमांक 01365 अनारक्षित १५ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत भुसावळ येथून दररोज ०६.३० वाजता सुटेल आणि बडनेरा येथे त्याच दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल.



ट्रेन क्रमांक 01366 अनारक्षित १७ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत बडनेरा येथून दररोज १३.३० वाजता सुटेल आणि भुसावळ येथे त्याच दिवशी १८.५५ वाजता पोहोचेल. ही गाडी वरणगाव, आचेगाव, बोदवड, कोल्हाडी, खामखेड, मलकापूर, वडोदा, बिस्वा ब्रिज, खुमगाव बुर्ती, नंदुरा, जलंब, शेगाव, श्रीक्षेत्र नागझरी, पारस, गायगाव, अकोला, येउलखेड, बोरगाव, काटेपूर्णा, मुर्तजापूर, माना, कुरम आणि टाकळी (फक्त 01366 साठी) या ठिकाणी थांबेल.


बडनेरा-नरखेड


ट्रेन क्रमांक 01367 अनारक्षित १५ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत बडनेरा येथून दररोज १३.०५ वाजता सुटेल आणि नरखेड येथे त्याच दिवशी १६.१५ वाजता पोहोचेल.



ट्रेन क्र. 01368 अनारक्षित १५ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत दररोज १७.०० वाजता नरखेड येथून सुटेल आणि बडनेरा येथे त्याच दिवशी २०.३५ वाजता पोहोचेल.


ट्रेन क्रमांक 01369 अनारक्षित १६ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत बडनेरा येथून दररोज ०५.५० वाजता सुटेल आणि नरखेड येथे त्याच दिवशी रात्री ०८.५५ वाजता पोहोचेल.


ट्रेन क्रमांक 01370 अनारक्षित १६ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत नरखेड येथून दररोज ०९.३० वाजता सुटेल आणि बडनेरा येथे १३.०० वाजता पोहोचेल. ही गाडी नवीन अमरावती, वळगाव, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड ऑरेंज सिटी, पुसला आणि मोवाड या ठिकाणी थांबेल.



अकोला-पूर्णा व अकोला-परळी गाड्या अकोट पर्यंत वाढवाव्यात


अकोला- पूर्णा व अकोला- परळी ही रेल्वेगाडी २१ नोव्हेंबर पासून पूर्ववत. हीच गाडी अकोट- पूर्णा व अकोट -परळी अशी झाल्यास अकोट, तेल्हारा व अकोला तालुक्यातील बऱ्याच नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल. आता अकोट- अकोला रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाले आहे व आता अकोट -अकोला या राज्य मार्गाचे काम चालू असल्याने अकोला- अकोट रस्ते प्रवास हा जिकरिचा होऊन बसला आहे. जसे विदर्भ एक्सप्रेस  व महाराष्ट्र एक्सप्रेस ही नागपूर ऐवजी गोंदिया पर्यंत वाढविण्यात आली आहे, त्याचप्रमाणे अकोला- पूर्णा व अकोला- परळी या रेल्वेगाड्या अकोट पर्यंत वाढविण्यात आल्यास, अकोला जिल्ह्यातील  जास्तीतजास्त नागरिक व गावे रेल्वेने जुळतील. या भागातील विकासाच्या दृष्टीने रेल्वेचे जाळे विस्तृत करणे महत्त्वाचे ठरेल.


डॉ. संजय खडक्कार,

माजी सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ.

टिप्पण्या