Gram Panchayat-General Election - Ward-reservation-Akola district: ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुक; प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम घोषित

Gram Panchayat General Election;  Ward formation and reservation program announced


 



अकोला,दि.30: निवडणूक आयोगाने रद्द केलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. कार्यक्रमानुसार प्रारुप प्रभाग रचना तयार करण्याचे कामे शुक्रवार 3 डिसेंबर पासून सुरु होईल तर 28 जानेवारी 2022 रोजी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.  




        

जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित तसेच आयोगाने प्रभाग रचना व आरक्षणाबाबत घोषीत केलेला कार्यक्रम चुकीच्या पद्धतीने राबविल्यामुळे सर्व निवडणूक कार्यक्रम रद्द करुन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम घोषीत केला आहे.





प्रारुप प्रभाग रचना कार्यक्रम


शुक्रवार दि. 3 डिसेंबर रोजी तहसिलदार यांनी गुगलअर्थचे नकाशे अध्यारोपीत (superimpose) करुन प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करणे.



गुरुवार दि. 9 डिसेंबर रोजी संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करुन प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करणे व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित करणे.



सोमवार दि. 13 डिसेंबर रोजी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रारुप प्रभाग रचनेची तपासणी करणे. तसेच समितीमध्ये गटविकास अधिकारी व संबंधित मंडळ अधिकारी यांचा समावेश असेल.



गुरुवार दि. 16 डिसेंबर रोजी समितीने प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्या मान्येतेसाठी सादर करणे.



मंगळवार दि. 21 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांनी नमुना ‘ब’ ची संक्षिप्त तपासणी करणे व त्यात आवश्यक असल्यास दुरुस्त्या करणे व मान्यता देणे.



शुक्रवार दि. 24 डिसेंबर रोजी दुरुस्त्या अंतर्भूत करुन प्रारुप प्रभाग रचना व आरक्षणाला(अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील माहिलांसह) तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता द्यावी व समितीच्या सर्व सदस्यांनी स्वाक्षरी करावी.



सोमवार दि. 27 डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभेची सूचना देणे.(आरक्षणाची सोडत काढणे)



शुक्रवार दि.31 डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभा बोलवून तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढणे.




प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविणे


       

सोमवार दि. 3 जानेवारी 2022 रोजी तहसिलदार यांनी प्रारुप प्रभाग रचनेच्या हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहिर सूचना प्रसिद्ध करणे.


      

सोमवार दि. 10 जानेवारी रोजी प्रारुप प्रभाग व रचनेवर हरकती सादर करणे.


     

बुधवार दि.12 जानेवारी रोजी प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना सुनावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करणे.


   

बुधवार दि. 19 जानेवारी रोजी प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सुचनांवर उपविभागीय अधिकारी यांनी सुनावणी घेणे.


    

सोमवार दि. 24 जानेवारी रोजी आलेल्या प्रत्येक हरकती व सुचनांवर सुनावणीनंतर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे.




उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी प्रभाग रचना व आरक्षणाला शुक्रवार 28 जानेवारी 2022 रोजी अंतिम मान्यता देणे. तसेच मान्यता प्राप्त अंतिम प्रभाग रचनेला बुधवार  2 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध देण्यात होईल.  

टिप्पण्या