ॲड.नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे होणाऱ्या झोनल दिव्यांग क्रिकेट स्पर्धे करीता अकोल्याचे 3 खेळाडूंची निवड वेस्ट झोन संघ मध्ये करण्यात आली .या मध्ये यष्टीरक्षक फलंदाज आनंद घोगलिया ( म.न.प मध्ये कार्यरत आहे ),अष्टपैलू अजय डोंगरे आणि आक्रमक फलंदाज मोहम्मद अझहर यांचा समावेश आहे.
वाराणसी उत्तरपरदेश येथे 18 ते 20 नोव्हेंबर कालावधीत दिव्यांग झोनल क्रिकेट स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारताचे 5 झोनचे संघ सहभागी होत आहे. या स्पर्धेत फिजिकली चॅलेंज क्रिकेट असोसिएशन अकोलाचे 3 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंनी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत मोलाची कामगिरी केली आहे. याच जोरावर त्यांची निवड झोनल संघ मध्ये करण्यात आली आहे.
या स्पर्धेत जे खेळाडू चांगली कामगिरी करतील त्यांची निवड भारतीय संघाचे कॅम्प साठी होणार असल्याने ही स्पर्धा खेळणे महत्वाचे आहे.
अकोला दिव्यांग संघाला इर्शाद खान, सुनील वानखडे यांचे मार्गदर्शन लाभले.
******
सबज्युनिअर राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत पलकने पटकाविले सुवर्ण पदक
अकोला : प्रभात किड्स स्कूलची इयत्ता नववीची विद्यार्थीनी पलक अजय झांबरे हिने नवव्या सब ज्युनिअर गर्ल्स महाराष्ट्र स्टेट बॉक्सिंग चॅम्पिअनशिपमध्ये सुवर्ण प्राप्त केले आहे.
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटने द्वारे आयोजित ९ वी सबज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धा रायगड जिल्ह्यातील महाड येथे ९ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर दरम्यान संपन्न झाली. या स्पर्धेत पलक झांबरे हीने ४६ ते ४८ किलो वजन गटात उत्कृष्ट प्रदर्शन करुन सुवर्ण पदक प्राप्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा