- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akola district-Curfew-new order: आता संपूर्ण अकोला जिल्ह्यात कलम 144 लागू: सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यास प्रतिबंध;जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांचे आदेश
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला: त्रिपुरा येथे घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद सर्व राज्यामध्ये उमटत आहेत, त्याच प्रमाणे अमरावती व यवतमाळ तसेच नांदेड या जिल्हयामध्ये घडलेल्या घटना लक्षात घेता अकोला जिल्हयामध्ये कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, याकरिता रविवार दिनांक 21/11/2021 रात्री 12.00 वाजेपासून मंगळवार दिनांक 23/11/2021 चे रात्री 12.00 वाजेपर्यंत अकोला जिल्हयातील संपूर्ण शहरी व ग्रामीण भागामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येत असल्याचे रविवारी रात्री जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी घोषित केले.
काय आहेत आदेश
file image
दिनांक 21/11/2021 मध्यरात्री पासून
संपूर्ण अकोला जिल्हयामध्ये फौजदारी प्र.सं. 1973 चे कलम 144 लागू
त्रिपुरा येथे घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद सर्थ राज्यामध्ये उमटत आहेत, त्याच प्रमाणे अमरावती व यवतमाळ तसेच नांदेड या जिल्हयामध्ये घडलेल्या घटना लक्षात घेता अकोला जिल्हयामध्ये कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, या करिता जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला यांनी संपूर्ण अकोला जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहावी, या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे बाबत विनंती केली.
अमरावती व यवतमाळ तसेच नांदेड या जिल्हयामध्ये घडलेल्या घटना लक्षात घेता संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता फोजदारी प्रक्रिया संहिता - 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करणे बाबत खात्री झाल्याने नीमा अरोरा, भा.प्र.से. जिलाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, अकोला, यांनी आपल्या अधिकारानूसार फोजदारी प्रक्रिया संहिता- 1973 चे कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले आहे.
आदेश
1. रविवार दिनांक 21/11/2021 रात्री 12.00 वाजेपासून मंगळवार दिनांक 23/11/2021 चे रात्री 12.000
बाजेपर्यंत अकोला जिल्हयातील संपूर्ण शहरी व ग्रामीण भागामध्ये जमावणंदीचे आदेश लागू करण्यात येत आहेत.
2, जमावबंदीच्या कालावधीमध्ये सार्वजनिक ठिकाणी चार किंवा चारपेक्षा जास्त व्यक्तीच्या गमावास प्रतीबंध राहील.
3. अकोट व अकोला या शहराकरिता उपविभागीय दंडाधिकारी यांनी निर्गमित केलेले आदेश कायम राहतील,
4. कोविड लसीकरणाचे काम नियमितपणे सुरु राहील.
5. कोणत्याही प्रकारच्या रॅली, धरणे, आंदोलने, मोर्चा इत्यादीचे आयोजन करता येणार नाही.
6. सदर आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याचे दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक, आकोला यांनी त्यांचे अधिनस्त अधिकारी / कर्मचारी व संबंधीत विभाग यांना त्यांचे स्तरावरुन अवगत करावे. तसेच जिल्हयात कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीकोनातून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी.
त्याच प्रमाणे, या आदेशाद्वारे विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा, काढलेल्या आदेशाचा अवमान करणा-या कोणत्याही व्यक्तीने, भारतीय दंड संहिता, 1860 चा 45 ) याच्या कलम 188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल. हा आदेश दिनांक 21/11/ 2021 रोजी जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केला आहे.
सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यास प्रतिबंध जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आदेश
file photo
संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था तसेच जातीय सलोखा कायम रहावा यासाठी सोशल मीडियावरून आक्षेपार्ह व प्रक्षोभक पोस्ट प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, उपविभागीय दंडाधिकारी,अकोला यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी संपूर्ण अकोला शहरासाठी फोजदारी प्रक्रिया सहित 1973 चे कलम 144 अंतर्गत संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत.भविष्य काळामध्ये देखील अकोला जिल्ह्यात सामाजिक व जातीय सलोखा कायम राहण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांनी प्रस्तावित केल्यानुसार, भारतीय दंड संहितेचे कलम 503,153 (A) व 116 अन्वये संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये सोशल मिडीयावरुन आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत.
आदेशात नमूद केल्यानुसार-
कोणत्याही प्रकारे धर्म, भाषा, जात किंवा जनसमाज यांच्या किंवा अन्य कोणत्याही कारणावरुन निरनिराळे धार्मिक, वांशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गट अगर जाती अगर जनसमाज यांच्यामध्ये तेढ अथवा शत्रुत्वाच्या, द्वेषाच्या भावना निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवा वा अनधिकृत माहिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायद्यान्वये कायदेशिर दंडनिय कारवाईस पात्र राहील.
निरनिराळे धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक गट अगर जाती अगर जनसमाज यांच्यामध्ये एकोपा टिकण्यास बाधक आणि ज्यामुळे सार्वजनिक शांतता बिघडते किंवा बिघडणे संभाव्य असते अशा पोस्ट सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायद्यान्वये कायदेशिर कारवाईस पात्र राहील.
एखादी व्यक्ती सार्वजनिक उपद्रव , अपराध करण्यास प्रवृत्त होईल अशा प्रकारे जनतेमध्ये अथवा जनतेपैकी एखाद्या भागामध्ये भीती किंवा भयग्रस्त वातावरण निर्माण होईल किंवा त्यामूळे तसे होण्याची शक्यता असेल किंवा एखाद्या समुहातील व्यक्तींना दुसऱ्या कोणत्याही वर्गाविरुद्ध किंवा समुहाविरुद्ध कोणताही अपराध करण्यास चिथावणी देण्याचा उद्देश असेल किंवा चिथावणी दिली जाण्याची शक्यता असेल अशा पोस्ट सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायद्यान्वये कायदेशिर कारवाईस पात्र राहील.
सोशल मिडीयावर जो कोणी व्यक्ती संस्था, संघटना हा ऍडमिन म्हणून कार्यरत असेल त्यांनी त्यांचे गृपवर कोणत्याही प्रकारच्या प्रक्षोभक पोस्ट प्रसारीत होणार नाहीत या बाबत काळजी घ्यावी. अन्यथा सदर ऍडमिन नियमानुसार कारवाईस प्राप्त राहील. त्याच प्रमाणे, या आदेशाद्वारे विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधांची किंवा काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.
हे आदेश अकोला जिल्ह्यातील शहरी तसेच प्रामीण भागाकरिता शनिवार दिनांक 20 नोव्हेंबर पासून पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा