Strong police presence in Akola: Increased curfew if unpleasant incidents occur; Internet and mobile services to be shut down at the same time: Police administration warns, Inspector General of Police camped in Akola
ॲड. नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: अमरावतीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात कालपासून 19 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली आहे. अकोल्यात अमरावती दंगली नंतर यासंदर्भातील गुन्ह्यात वाढ झाल्याने अकोल्यात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून,पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा दस्तुरखुद्द अकोल्यात तळ ठोकून आहेत.
अकोल्यात संचारबंदी ही सायंकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. तर जमावबंदी सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचा आवाहन प्रशासनच्या वतीने करण्यात आले आहे.अकोल्यात घडलेल्या काही अप्रिय घटनेमुळे संचारबंदी लावण्यात आली आहे.
10 लोकांना अटक
आतापर्यंत अकोट शहरात 2 गुन्हे, अकोला शहरात 1 गुन्हा तर प्रक्षोभक मेसेज , फोटो, व्हिडीओ पाठवणाऱ्या 4 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर अकोल्यातील गुन्ह्यात एक तर अकोटच्या दगडफेकीत 10 लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी ऐसआरपीएफच्या 4 तुकड्या, आरसीबीच्या 3 प्लॅटून तर वाशिम आणि यवतमाळहून प्रत्येकी 100 पोलीस सह अकोला शहरात 300 पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
सहकार्य करण्याचे आवाहन
पोलीस प्रशासनाने जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. अप्रिय घटना घडल्यास संचारबंदी वाढवण्यात येणार, सोबतच इंटरनेट आणि मोबाईल सेवा देखील बंद करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरले
अमरावती विभाग पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना आणि अकोला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर सुद्धा समाज कंटकांवर करडी नजर ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा