The body was found floating in the water under a big bridge over the river Morna; Excitement in the area
अकोला: जुने शहर कडे जाणारा मोरणा नदीवरील मोठ्या पुलाखाली आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास नागरिकांना एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात काही वेळ खळबळ माजली होती. मृतदेह पाण्याबाहेर काढला असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.
प्राथमिक माहितीच्या आधारे वृत्त असे की, आज 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास जुने शहर कडे जाणार मोठया पुलाखाली मोरणा नदीत एक मृतदेह तरंगत असताना काही नागरिकांना दिसला. ही बाब नजीकच्या सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला कळविण्यात आली.
सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रशेखर कडू आणि अग्निशमन विभागचे कर्मचारी लगेच घटनास्थळी पोहचले. अग्निशमन विभागचे कर्मचारी प्रकाश पलमकर, गुलाम मुस्तफा, अनिल जगताप, पिंटू ठोसर यांनी मृतदेह बाहेर काढला. दरम्यान,बघेकऱ्यांची गर्दी घटनास्थळी झाली होती.
यानंतर जुने शहर आणि सिटी कोतवाली पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली असता, मृतकाच्या अंगावरील पोशाखातील एका खिश्यात आधार कार्ड मिळाले. यावर राजेश पोहमल भोलानी वय 50 वर्ष रहिवासी अमोल रतन मंगल कार्यालय जवळ कच्ची खोली सिंधी कॅम्प खदान अकोला लिहलेले आढळले. पुढील तपास व कारवाई पोलीस करीत असल्याची माहिती प्राप्त झाली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा