Akola Big Breaking: Ridhora: workers-died-fire-welding-work: वेल्डिंग काम करताना लागलेल्या आगीत दोन कामगारांचा जागीच मृत्यू; तीन गंभीर

Two workers died on the spot in a fire that broke out while welding work;  Three serious




 

नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : वेल्डिंग काम सुरू असतांना लागलेल्या आगीत दोन कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना अकोला शहर नजीक असलेल्या रिधोरा येथे आज सायंकाळी घडली.




याबाबत सविस्तर वृत्त असे की, 



अकोला येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील रिधोरा गावाजवळ असलेल्या ईगल इन्फ्रा कन्स्ट्रक्शन प्लांट येथे सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान डांबरच्या टँकरला वेल्डिंग करण्याचे काम सुरू होते. या टँकर मधून अनेक दिवसांपासून गळती सुरू होती. दुरुस्तीचे काम सुरू असतांना अचानक टँकरला भीषण आग लागली.




सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आग एवढी भीषण होती की, वेल्डिंग करणाऱ्या पाच मजूरांपैकी दोन मजुरांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने अकोल्यातील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांचा वापर करण्यात आला. मोहम्मद आतिफ खान आणि संजय पवार अशी मृतांची नावे असल्याचे सूत्रांनी सांगितले. या आगीत मृत्यू झालेल्यांमध्ये आणखी काही कर्मचाऱ्यांचा समावेश आल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.





घटनेची माहिती मिळताच डॉ. रामेश्वर पुरी (उपविभागीय अधिकारी, बाळापूर) व अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहेत.

टिप्पण्या