- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मुंबई: क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अडकलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला असून, उद्या किंवा परवा आर्यनची तुरंगातून सुटका करण्यात येणार आहे.
आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी आणि सतीश मानेशिंदे हे जामीन याचिकेवरील सुनावणीसाठी आज मुंबई उच्च न्यायालयात हजर होते. आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालय बाहेर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना, आर्यन सह अरबाज आणि मूनमून यांना जमानत मंजूर झाल्याचे सांगितले. यानंतरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आर्यन खान उद्या (शुक्रवार) किंवा परवा (शनिवारी) तुरुंगातून बाहेर येईल,असे देखील सांगितले.
आर्यन खान ७ ऑक्टोबरपासून आर्थर रोड तुरुंगात आहे. क्रुझमधून ड्रग्ज जप्त केल्या प्रकरणी आर्यन खान आणि इतरांना एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले होते. नंतर त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी एनसीबीने एकूण 20 जणांना अटक केली होती.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा