Navratri 2021:Akola newsletter: 'कन्यापूजन' निम्मित तीनशे मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप व इतर बातम्या





अकोला: नवरात्राच्या पर्वावर कन्या पूजन करून कात्यायनी देवीची आराधना श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण सत्संग मंडळाच्या वतीने करण्यात आली. समाजाला दिशा देणाऱ्या व धर्म रक्षण करणाऱ्या मातृशक्तीला आत्मबळ निर्माण होवो, अशी प्रार्थना आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली. यानंतर आमदार शर्मा यांनी कन्यापूजन करीत तीनशे मुलींना शैक्षणिक साहित्य वितरण करून आशीर्वाद घेतले.




स्थानिक  अशोक नगर स्थित संत रविदास चौक येथील जागृत दुर्गा माता मंदिरात विशेष पूजा अर्चना  करून कन्या पूजन करून शैक्षणिक साहित्य भेट देऊन त्यांच्या सोबत महाप्रसादाचा लाभ घेतला. 




यावेळी रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.




श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने दरवर्षी कन्यापूजन वेगवेगळ्या भागात करण्यात येते. माळीपुरा या भागात गेल्यावेळी तर यंदा अकोट फैल या भागात करण्यात आला. तसेच गीता नगर ,डाबकी रोड परिसरात सुद्धा कन्या पूजनाचा कार्यक्रम समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.



                   ******



बाळ कीर्तनकार ज्ञानेश्वरी शेटेचा सन्मान





अकोला: जिल्हा पोलिस दलाच्या वतीने कर्तव्य योगिनी सन्मान या कार्यक्रमाचे १० ऑक्टोबर रोजी आयोजन केले होते. यानिमित्त दहा वर्षीय बाल कीर्तनकार ज्ञानेश्वरी शेटे हिच्या हरी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ज्ञानेश्वरी शेटे हिचा सन्मान करण्यात आला.



भारत देशातील कोरोना नाहीसा करायचा असेल तर सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन कोरोनाच्या दोन्ही लसी घेऊन प्रशासनाला सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी शेटे हिने केले. 




                   ******


उद्या दिनांक 12/10/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.



1)नागरी आरोग्य केंद्र खदान आदर्श कॉलनी 16 नंबर शाळा नागरी 

2) मलेरिया कॉलनी कौलखेड

3)   मनपा शाळा क्रमांक 3 व 4 (टेम्पल गार्डन शाळा)प्रांगणात

रामदासपेठ पोलिस स्टेशनच्या बाजूला 

4) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

5) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना

6)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी 

7)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

8) GMC अकोला

9) IMA hall सिव्हिल लाईन चौक, अकोला 

10) नागरी आरोग्य केंद्र न्यु शिवाजी नगर शिवसेना वसाहत मनपा शाळा

11)डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह जेतवन नगर

12) आर के टी आयुर्वेदिक कॉलेज जठारपेठ 



18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covishield *100 ऑनलाइन अपॉइंटमेंट  प्रथम डोस तथा  द्वितीय डोस) [ 200 कूपन   प्रथम डोस तथा द्वितीय डोस ]साठी

पद्धतीने सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.




1)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड

2) लेडी हार्डिंग DHW

3)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर

मनपा शाळा क्रमांक 22 

4) मोहम्मद अली रोड ताजना पेठ पोलीस चौकी

5) गौतम नगर जुना आरटीओ रोड


18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covexin (* 100ऑनलाइन अपॉइंटमेंट  प्रथम डोस तथा द्वितीय डोस) [  200कूपन  प्रथम तथा  द्वितीय डोस ]साठी

 सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.


ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील


*अकोला महानगरपालिका अकोला.




                    ******


              कोरोना अलर्ट


*आज सोमवार दि.११ ऑक्टोबर २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल-११४*

*पॉझिटीव्ह-एक*

*निगेटीव्ह-११३* 


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य= एकूण पॉझिटीव्ह- एक


*अतिरिक्त माहिती* 


आज  दिवसभरात एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ही महिला मलकापूर, जि. अकोला येथील रहिवासी आहे.


*आता सद्यस्थिती*


*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-४३२६५+१४४२९+१७७=५७८७१*

*मयत-११३८*

*डिस्चार्ज-५६७१६*

*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-१७* 


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त  माहितीनुसार) 


*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*




                    ******


विसर्ग अलर्ट: काटेपूर्णा प्रकल्प


आज दि. *११/१०/२०२१* रोजी सायंकाळी *८.००* वाजता काटेपूर्णा  प्रकल्पाचे  एकूण *२* वक्रद्वारे प्रत्येकी *२० cm* उंचीने उघडली असून नदीपात्रात एकूण  *३४.११ घ.मी./से* एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे.पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी  सावध राहावे.       


 *काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष*  



    𝐊𝐚𝐭𝐞𝐩𝐮𝐫𝐧𝐚 𝐏𝐫𝐨𝐣𝐞𝐜𝐭                                                   

 *11/10/2021                       8.00pm*       

 *𝐋𝐞𝐯𝐞𝐥 - 347.77 𝐦𝐭𝐫* 

 *𝐒𝐭𝐨𝐫𝐚𝐠𝐞* -  *86.35 𝐦𝐦3* 

 *𝐏𝐞𝐫𝐜𝐞𝐧𝐭𝐚𝐠𝐞  - 100%*

टिप्पण्या