Election 2021-22: Voter List: मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम; १३,१४ व २७,२८ नोव्हेंबर रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम

Special revision of voter list program;Special campaign for voter registration on November 13, 14 and 27, 28





अकोला,दि.२७: मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. १ जानेवारी २०२२  या अर्हता दिनांकावर घोषित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार मतदार नोंदणीकरीता कालावधी निश्चित करण्यात आला असून शनिवार, रविवार दि. १३, १४ व २७,२८ नोव्हेंबर या कालावधीत  विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निमा अरोरा यांनी दिली आहे.


जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांमधील छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमानुसार एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी सोमवार दि.१ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. सोमवार दि. १ ते मंगळवार दि. ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येईल. तसेच विशेष मोहिमेअंतर्गत शनिवार दि. १३, रविवार दि.१४ व शनिवार दि. २७, रविवार दि.२८ नोव्हेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. सोमवार दि. २० डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येणार आहे. तर मतदारांची अंतिम यादी बुधवार दि. ५ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध होईल.


जिल्ह्यातील नागरिकांनी  मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नावे वगळणे, इ. करीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  यांच्याकडे आवश्यक फॉर्म भरुन  द्यावे. मतदार यादीतील दुबार नावे, स्थलांतरीत, मयत मतदारांची नावे वगळणे ही कार्यवाही सुद्धा याच मोहिमेत होणार आहे. जिल्ह्यातील पात्र मतदार नव मतदार यांनी आपली नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी  www.nvsp.in  या संकेतस्थळावर जाऊन  आपले नाव नोंदवावे. तसेच voter helpline app च्या सहाय्यानेही मतदारांना आपले नाव नोंदविता येईल. याव्यतिरिक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे विहित नमुन्यात अर्ज भरुन ऑफलाईन पद्धतीनेही नाव नोंदविता येईल.  तरी मतदारांनी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.



विशेष ग्रामसभेचे आयोजन


मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाकरीता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये  दि.16 नोव्हेंबर 2021 रोजी ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी  निमा अरोरा यांनी दिले आहे.


भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून  दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीची पडताळणी व दुरुस्ती करुन त्या त्रुटी विरहीत करण्यात येतात. आताही दि. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकानूसार नविन मतदार नांव नोदणी करुन मतदार यादी सुधारीत  करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम गावातील प्रत्येक नागरीकांपर्यत सुलभतेने पोहचावा. तसेच या उपक्रमाचा प्रभावी व यशस्वीरीत्या अंमलबजावणी व्हावी याकरीता ग्रामविकास विभागाच्या शासन परीपत्रकानुसार, अकोला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये मंगळवार दि. 16 नोव्हेंबर रोजी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासाठी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. निवडणूक विभागाच्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील नागरीकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे इत्यादी करिता मतदार केंद्रस्तरीय अधिकारी(बी.एल.ओ) यांचेकडे आवश्यक फॉर्म भरुन देण्यात यावे. मतदार यादीतील दुबार, स्थलांतरित, मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही सुद्धा प्रस्तूत मोहिमेत घेण्यात येणार आहे. या व्यतिरीक्त ज्या मतदारांना आपले नाव  नोंदवावयाचे असेल त्यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज भरुन मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ) यांचेमार्फत मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे द्यावे, असे आवाहन  करण्यात आले आहे.


                      ******


                  *कोरोना अलर्ट*


*आज बुधवार दि.२७ ऑक्टोबर २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

 

*प्राप्त अहवाल-२२१*

*पॉझिटीव्ह-शुन्य*

*निगेटीव्ह-२२१* 


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शून्य+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य= एकूण पॉझिटीव्ह- शून्य


*अतिरिक्त माहिती* 


आज  दिवसभरात कुणाचाही  अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.


*आता सद्यस्थिती*


*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-४३२७६+१४४३०+१७७=५७८८३*

*मयत-११३९*

*डिस्चार्ज-५६७३१*

*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-१३* 


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त  माहितीनुसार) 


*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*




उद्या दिनांक 28/10/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.


1)नागरी आरोग्य केंद्र खदान आदर्श कॉलनी 16 नंबर शाळा नागरी 

2)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी 

3) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट

4) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

5) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना

6)नागरी आरोग्य केंद्र उमरी 

श्री हरी पार्क लहान उमरी पोलीस स्टेशन जवळ

7)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

8) GMC अकोला

9) IMA hall सिव्हिल लाईन चौक, अकोला 

10)नागरी आरोग्य केंद्र न्यू शिवाजी नगर शिवसेना वसाहत

मनपा शाळा

11) आर  के टी आयुर्वेदिक महाविद्यालय जठारपेठ

12) रूपचंद नगर अंगणवाडी


18+ च्या वरील  नागरिकांकरिता Covishield   प्रथम डोस तथा  द्वितीय डोस

पद्धतीने सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.


1)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड

2) लेडी हार्डिंग DHW

3)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर

मनपा शाळा क्रमांक 22 


18+ च्या वरील  नागरिकांकरिता Covexin  प्रथम डोस तथा द्वितीय डोस) 

 सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.


 युवा स्वास्थ मिशन कोविड लसीकरण* 

1)  आर एल टी कॉलेज

2)एस जी एस पी एस  इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज कौलखेड


ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी पासून सुरू राहील


अकोला महानगरपालिका अकोला.






टिप्पण्या