Deglur by-election:BJP:Nanded: तर शेतकऱ्यांनाही 'हर्बल तंबाखू' लावायची परवानगी द्या - देवेंद्र फडणवीस

नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे देगलूर पोट-निवडणुकीसाठी प्रचारसभा. meeting at Deglur in Nanded district for Deglur by-election 




नांदेड: महाविकास आघाडीतले लोक कशात भ्रष्टाचार करतील याचा नेम नाही. जमेल त्यात खात आहेत. सामान्य माणसाची अवस्था त्यांनी वाईट करुन टाकली आहे, अशी टीका आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी येथे देगलूर पोटनिवडणुकीसाठी झालेल्या प्रचार सभेत फडणवीस बोलत होते. 





नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी येथे देगलूर पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारसभेला  देवेंद्र फडणवीस यांनी आज हजेरी लावली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले. यासोबत त्यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावरही नामोल्लेख न करता अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली. ते म्हणाले, “एका मंत्र्याचा जावाई गांजा विकताना आढळला. पण मंत्री म्हणतो की, हा हर्बल तंबाखू आहे. मग आमचे सदाभाऊ खोत म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तुमचा मंत्री हर्बल तंबाखू पिकवू शकतो तर शेतकऱ्यांनाही हर्बल तंबाखू लावायची परवानगी द्या. म्हणजे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील”






यावेळी  फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. अद्याप शेतकऱ्यांना पीकविम्याची पुरेशी रक्कम मिळालेली नाही. आपल्या सरकारच्या काळात आपण किती रक्कम प्रत्येक जिल्ह्याला दिलेली होती, हे मुद्दे त्यांनी या भाषणात अधोरेखित केले. राज्य सरकार स्वतः भ्रष्टाचार करत आहे आणि मदत द्यायची वेळ आली की केंद्राकडे बोट दाखवत आहे, अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारला टोला मारला.


हाच मुद्दा पुढे नेत ते म्हणाले की, “हे सरकार इतकं लबाड आहे की काहीही झालं तरी ते केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मला तर असं वाटतंय की यांच्या बायकोने मारलं तरी सांगतील की केंद्र सरकारचा हात आहे, असे लबाड लोक इथे आहेत”.





राज्यातील सरकारची 2 वर्षांतील उपलब्धी काय. जलयुक्त शिवार बंद. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना बंद. नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना बंद.स्मार्ट योजना बंद.ड्रीप इरिगेशन बंद. रस्त्यांची कामे बंद.धरणांची कामे बंद. शेतकर्‍यांचा विमा,वीज बंद. शेतकर्‍यांना मदत बंद. राज्यात केवळ बंद सरकार. या सरकारने केला तो फक्त भ्रष्टाचार. केवळ छपाईचा आणि खाण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मिळेल तिथे खाऊ आणि सोबत राहू, हा एकमात्र कार्यक्रम सुरू. या खाण्याचा हिशेब सुद्धा संगणकावर ठेवला आहे. महाराष्ट्रातील जनताच यांना धडा शिकवेल, असे यावेळी फडणवीस म्हणाले. 



दरम्यान बिलोली, नांदेड येथे संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. योजना बंद आणि वसुली सुरू. हे तर चालू लोकांचे...चालू सरकार! तिजोरीत पैसा आहे, पण महाविकास आघाडी सरकारमध्ये नियत नाही. कोरोनाच्या कालखंडात एकाही घटकाला त्यांनी मदत केली नाही. लोक जगताहेत की मरताहेत याची पर्वा केली नाही. जनविरोधी हे राज्यातील महाविकास आघाडी सरकार आहे. मराठा, ओबीसी अशी सगळी आरक्षणं यांनी घालविली. मराठवाडा वैधानिक विकास मंडळ बंद केले. पण, मराठवाड्यातील एकही मंत्री बोलला नाही. हा साधा विषय नाही. पुढच्या अनेक पिढ्यांच्या तोंडचा विकास पळवून नेण्याचा हा प्रकार आहे. शेतकर्‍यांना फुटकी कौडी नाही आणि नेत्यांच्या घरात पॅकेज जात आहेत,असे फडणवीस म्हणाले.




टिप्पण्या