Daily newsletter:Maharashtra: राज्यातील उपाहारगृहे,दुकाने यांच्या वेळा वाढविणार; अम्युझमेंट पार्क देखील सुरू करणार – उद्धव ठाकरे

Will increase the number of restaurants and shops in the state;  Will also start an amusement park - Uddhav Thackeray



मुंबई, दि 18 : कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने  राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले. वर्षा येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  होते. या वेळी लहान मुलांच्या टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते. अम्युझमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबर पासून सुरू होतील.


कोविड व्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून त्यांच्या उपचारांकडे देखील पुरेसे लक्ष द्यावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.




यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्णसंख्या कमी होतांना दिसते आहे. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहेही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांच्या देखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे तसेच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागास केल्या.


दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, याबाबतीत लोकांनी बेसावध राहू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी.


कोरोनावरील उपचारांसाठी जगात नवनवीन प्रयोग होत असून येणाऱ्या नवीन औषधांच्या बाबतीतही त्यांची परिणामकारकता, किंमत, उपलब्धता याबाबत आत्तापासूनच माहिती घेत राहावी व संबंधितांच्या संपर्कात राहावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



                   ******


नागपूर हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर पासून; अधिवेशन तयारीसाठी विशेष कोविड प्रतिबंधात्मक नियोजन


Nagpur Winter Convention from 7th December;  Special covid preventive planning for convention preparation




नागपूर, दि.18 : महाराष्ट्र विधिमंडळाचे यंदाचे तिसरे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सात डिसेंबरपासून प्रस्तावित आहे. याबाबतच्या तयारीचे नियोजन करण्यासाठी आज सर्व संबंधित विभागांची उच्चस्तरीय बैठक विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. 



कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्यात येणार आहे.

नागपूर येथे विधानभवनातील मंत्रीपरिषद दालनात प्रधान सचिव श्री.भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा,  जिल्हाधिकारी विमला आर , नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांसह विविध संबंधित विभागांचे प्रमुख  उपस्थित होते.

महाराष्ट्र विधान परिषद सभापतींचे सचिव म. मु. काज, उपसचिव राजेश तारवी,अवर सचिव रविंद्र जगदाळे, महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अनिल महाजन, विधानभवनाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी तथा व सचिव सुनील झोरे, विधान भवनाच्या वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, विधीमंडळाचे पध्दती विश्लेषक अजय सुर्वणकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.




मुंबई येथे पुढील आठवड्यात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे.त्यादृष्टीने आजच्या बैठकीत अनुषंगिक तयारीसाठी सर्व विभागाने केलेल्या प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यात आला.  यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यत लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.  त्यामुळे अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यासोबत दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक करण्यात आले आहे. याशिवाय दोन्ही डोस घेतल्यानंतरही या  अधिवेशनादरम्यान प्रत्येकाला पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य असेल. त्यामुळे विधीमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहायक, सर्व अधिकारी-कर्मचारी, वृत्तसंकलनासाठी येणारे माध्यम प्रतिनिधी, सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस, राज्यभरातून येणारे वाहन चालक या सर्वांच्या आरटीपीसीआर टेस्ट अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याची महत्त्वपूर्ण सूचना श्री. भागवत यांनी आरोग्य विभागाला आज केली. कोरोना पार्श्वभूमीवर मर्यादित प्रवेश राहील. त्यामुळे विधिमंडळ परिसरात  सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यांच्यासाठीची आवश्यक व्यवस्था परिसरात करण्यात यावी. याशिवाय सभागृहामध्ये ‘सोशल डिस्टंसिंग’  राखायचे असल्यामुळे सदस्यांना एक आसन सोडून बसण्याची व्यवस्था लक्षात घेता यावेळी अभ्यागतांना कामकाज बघण्यासाठी प्रवेश दिला जाणार नाही.

तत्पूर्वी, विधिमंडळ परिसरात सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात सर्वप्रथम चर्चा झाली. विधिमंडळ परिसरात नवीन इमारत कार्यान्वित झाली आहे. या  इमारतीसाठी आवश्यक असणारी सुरक्षा व्यवस्था व अनुषंगिक उपाययोजना करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. यासोबतच विधान भवन, विधान भवनाबाहेर परिसर, आमदार निवास, रविभवन, 160 खोल्यांचे गाळे, सुयोग पत्रकार निवास या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतचे निर्देश देण्यात आले. आमदार निवासामध्ये महिला आमदारांसाठी एक मजला राखीव ठेवण्यात यावा व विशेष पोलीस सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी, असे निर्देशित करण्यात आले.




अधिवेशन काळात करण्यात आलेल्या वाहन व्यवस्थेबाबत तसेच पार्किंग व्यवस्थेबाबत सूचना करण्यात आल्या. दूरध्वनी व्यवस्था, वाहन व्यवस्था, अखंडित वीज पुरवठा, अहोरात्र वैद्यकीय सुविधा, नैसर्गिक आपत्तीमध्ये आपत्कालीन व्यवस्था, अग्निशमन दलाची उपलब्धता, विनाअडथळा इंटरनेट, वाय-फाय सुविधा, रेल्वे आरक्षण, खानपान व्यवस्था, अन्नपदार्थ व पेय यांची तपासणी तसेच उत्तम स्वच्छता या संदर्भातही सर्व विभाग प्रमुखांशी चर्चा करण्यात आली.





                    ******

देशातील युवकांनी डॉ अब्दुल कलाम यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी- सैय्यद नासीर 

The youth of the country should be inspired by the work of Dr. Abdul Kalam - Syed Nasir



अकोला : महान शास्त्रज्ञ मिसाईल मॅन तसेच देशाचे  माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांनी देशातील सर्वाधिक पगार असलेल्या राष्ट्रपती पदाच्या पगारातील केवळ एक रुपया पगार घेणारे आणि आपल्या पश्चात स्वतःसाठी कोणतीही संपत्ती न जमावणारे आणि जन्मापासून अंत पर्यंत देशसेवा करणारे माजी  राष्ट्रपति डॉ कलाम यांची प्रेरणा देशातील युवकांनी  घ्यावी असे आवाहन माजी राष्ट्रपति डॉ. कलाम यांची जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना जन लोकशाही संगठनचे संस्थापक अध्यक्ष सैय्यद नासीर यांनी केले आहे. 




महान शास्त्रज्ञ  भारतरत्न डॉ अब्दुल कलाम यांची जयंती जन लोकशाही संगठन तर्फ मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली.  


जन लोकशाही संगठणचे संस्थापक अध्यक्ष सैय्यद नासिर यांनी डॉ कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला  यावेळी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना सैय्यद नासिर म्हणाले की, भारत देशाची सेवा करण्यासाठी देशातील युवकांनी  उच्चशिक्षण घेतले पाहिजे . ह्या कार्यक्रमात  पर्सनालिटी डेवलपमेंट कोच शाहनवाज अली, पत्रकार सय्यद ज़मीर, सैय्यद जुबेर, समीर खान, ज़ाहिद खान यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बालकांना मिष्ठान वाटप करण्यात आली.


कार्यक्रमात सय्यद नासिर यांनी सांगितले कि, बिकट परिस्थितीत ही अब्दुल कलाम ह्यांनी शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपला खर्च आणि परिवार सांभाळला आहे  त्यांना पद्मविभूषण पुरुस्काराने सन्मानित करण्यात आले. देशातील मोठमोठ्या संशोधन संस्थानचे ते डायरेक्टर सल्लागार आणि सदस्य सुध्दा राहिले आहेत. आज समाजातील युवकांनी त्यांच्या कार्याची प्रेरणा घेण्याची गरज आहे  ज्यामुळे  देशाच्या प्रगतिमध्ये  महत्वाची सहभाग ठरेल. 



पर्सनालिटी डेवेलपमेंट कोच शाहनवाज अली यांनी युवकांना संबोधित करतांना सांगितले की, डॉ कलाम ह्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास केले त्यांनी नेहमीच पुस्तक वाचन आणि त्यातून ज्ञान वाढिसाठी नेहमीच प्रयत्नशील राहीले  यासोबतच भावी पिढीला दिशा मिळावी म्हणून अनेक पुस्तकांचे लिखाणही त्यांनी केले असून त्यांची पुस्तके त्यांची प्रेरणा आहेत असे सांगितले त्यांच्या पुस्तकातुन पन युवकानना उज्वल भविषयची वाट भेटु शकते.



                     ******



नवरात्रीनिमित्त समाजसेवक गजानन हरणे यांचा नऊ दिवस विविध कायद्यांचा जागर

On the occasion of Navratri, social worker Gajanan Harne's nine days awakening of various laws


अकोला: निर्भय बनो जनआंदोलन, सेवाश्री बहुद्देशीय संस्था, विविध दुर्गा उत्सव मंडळ, नेहरू युवा मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभर नवरात्रीनिमित्त नऊ दिवस जागर कायद्यांचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात विविध  गावांमध्ये समाजसेवक गजानन हरणे यांच्या प्रवचना द्वारे, उत्साहात पार पडला. 




नवरात्र उत्सव म्हटले की  धार्मिक कार्यक्रम एवढ्यापुरते मर्यादित न ठेवता या उत्सवाचा जनसामान्य लोकांना फायदा व्हावा म्हणून शासनाने केलेल्या विविध योजना, व जनहिताच्या अनेक कायदे सर्वसामान्य गोरगरीब, शेवटच्या  माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजसेवक गजानन हरणे यांनी हा उपक्रम जिल्हाभर राबवला आहे. 




माहितीचा अधिकार, पंचायत राज ग्रामसभा, दारूबंदीचा कायदा, रेशनिंग, गॅस संबंधित कायदा, दप्तर दिरंगाईचा कायदा, सेवा अधिनियम, ग्राहकाचा कायदा, शेतकऱ्या संबंधित विविध कायदे, महिला संबंधित विविध कायदे, बेरोजगार युवकांसाठी च्या विविध योजना, आदी अनेक योजनेबाबत व कायद्याबाबत जनजागृतीचे कार्यक्रम या नवरात्री निमित्त राबवून नऊ दिवस विविध कायद्यांचा जागर गावागावांमध्ये समाजसेवक गजानन हरणे यांनी आपल्या प्रवचना द्वारे केला. तसेच गजानन हरणे यांनी प्रकाशित केलेल्या विविध कायद्याचे पुस्तकाचे मोफत वितरण लोकांना करण्यात आले. 




विविध गावच्या दुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, निर्भय बनो जनआंदोलन  कार्यकर्त्यांनी, नेहरू युवा मंडळ, विविध गावचे सरपंच व उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनी मोलाचे  योगदान कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन  साठी दिले आहे. त्यामध्ये देऊळगाव, पिंजर, सावरगाव, आडगाव, बोरगाव, बोरटा, कान्हेरी, वरुड, सुलतानपूर आदी गावांमध्ये नवरात्रीचे जागरण कार्यक्रम करण्यात आला त्या, त्या गावच्या  मंडळांनी हा कायद्याचा जागर जनजागृती कार्यक्रम यशस्वी करण्याकरता परिश्रम घेतले. 



                   ******


लसीकरण: Vaccination:Akola city


उद्या दिनांक 19/10/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.


1) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

2) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना


 18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covishield(*100 ऑनलाइन अपॉइंटमेंट  प्रथम डोस तथा  द्वितीय डोस) [ 200 कूपन   प्रथम डोस तथा द्वितीय डोस ]साठी

पद्धतीने सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.


1)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर

मनपा शाळा क्रमांक 22 


18+ च्या वरील  नागरिकांकरिता Covexin  ( 100ऑनलाइन अपॉइंटमेंट  प्रथम डोस तथा द्वितीय डोस) [  200कूपन  प्रथम तथा  द्वितीय डोस ]साठी

 सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.


ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी पासून सुरू राहील


 अकोला महानगरपालिका अकोला.

टिप्पण्या