Crime news: पुसद अर्बन बँकेकडुन फसवणुक ! संगनमत करुन तारण नसलेल्या मालमत्तेची केली विक्री : न्यायालयाचा आदेश मात्र अकोट पोलिसांचे अभय ?

Crime news: Fraud from Pusad Urban Bank!  Sale of unsecured property by conspiracy






अकोला दि ८ : कर्ज प्रकरणात तारण नसलेला कोट्यावधी रुपये किमंतीच्या प्लॉटची पुसद अर्बन बॅंकेकडून गैरकायदेशीर विक्री करुन फसवणुक करण्यात आली आहे. या संदर्भात कागदपत्रांसह रितसर तक्रार करून ही पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली नाही. अखेर यासाठी न्यायालयात दाद मागितली. तेव्हा न्यायालयाने प्रस्तुत प्रकरणाचा भादंवि कलम ४६८, ४७१, ४२०, ५०४, ५०६ या कलमान्वये चौकशी करण्याचे निर्देश देवूनही अद्याप पोलिसांनी कारवाई केली नाही. अशी माहिती प्रशांत रायपुरे यांनी दिली. स्थानीय हॉटेल सेंटर पाल्झा येथे या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत पुसद अर्बन बँकेकडून संगनमताने करण्यात आलेल्या या अपहार प्रकरणाची त्यांनी माहिती दिली. यावेळी त्यांचे विधीज्ञ एस. डी. उपर्वट उपस्थित होते.



यावेळी रायपुरे यांनी सांगीतले की, विरेन फुड अण्ड बेवरेज प्रा.लि.चे एकूण ७ संचालक यांना सन २०१४ मध्ये कर्ज मंजूर करण्यात आले होते. यात पुसद अर्बन को-ऑप. बँक लि.चे तत्कालीय अध्यक्ष यांनी विरेन फुड अण्ड बेवरज प्रा.लि.मध्ये संचालक म्हणून आपणास नेमून सदरचे कर्ज विरेन फुड ॲण्ड प्रा.लि.ला चार कोटी पंचवीस लाख रूपये पैकी फक्त एक कोटी तीस लाख रूपये वितरीत करून कर्ज वितरण थांबविण्यात आले होते . दरम्यान कर्ज वसुलीसाठी बँकेने मौजे अकोट येथील भाग २ शेत सर्व्ह क. ५९६/५, प्लॉट क. ७ यामधील १२०० चौ.फूट प्लॉट व त्यावरील बांधकाम, जे बँकेला गहाण दिलेले नव्हते व त्यावर बॅकेचा बोजा नसतांना आपली कोणतीही परवानगी वा आपणास न कळविता दि. ३१/०३/२०१७ रोजी गैरकायदेशीररीत्या रोशन जनार्धन बढिए यांना सदरचा १२०० चौ.फूट प्लॉट व त्यावरील बांधकामाची विक्री केली. या अवैद्य व बेकायदेशीर प्रकाराबद्दल आपण बॅकेचे अध्यक्ष शरद मईद,गजानन बापुराव पोलकट, कैलाश सिंग,अतुल आखरे, संजय दिगांबर सुरोश, रोशन जनार्धन बढिये यांच्या विरूध्द वि.अकोट न्यायालयात फौजदारी केस दाखल केली. त्यानंतर रोशन जनार्धन बढिये यांनी आपला १२०० चौ.फूट प्लॉट व त्यावरील बांधकाम गैरकायदेशीररीत्या संजय मधुकरराव पखान, संतोष मधुकरराव पखान यांना गैरकायदेशीर विकी केला व त्यावर लक्ष्मण पांडुरंग मिरगे व रामरतन साहेबराव पुंडकर यांनी खरेदीखतावर साक्षीदार म्हणून सह्या केल्या. संजय मधुकरराव पखान व संतोष मधुकरराव पखान यांनी सदरच्या १२०० चौ.फूट प्लॉटवर आपणास येण्यास मज्जाव करीत शिविगाळ करून धमकी दिली.या प्रकाराने आपण घाबरून या बाबतीत आपण वि. न्यायालय अकोट येथे फौजदारी केस दाखल केली. 



या प्रकरणात वि. न्यायालयाने दि. १८/०९/२०२१ रोजी आदेश पारीत करून रोशन जनार्धन बढिए, संतोष मधुकरराव पखान,संजय मधुकरराव पखान,लक्ष्मण पांडुरंग मिरगे व रामरतन साहेबराव पुंडकर यांच्या विरूध्द भा.द.वि.कलम ४६८, ४७१, ४२०, ५०४, ५०६, ४४७, ३४ यानुसार फौजदारी संहिता कलम २०२ नुसार चौकशी करण्याचे आदेश संबंधित पोलीस स्टेशनला दिलेले आहेत. मात्र, अद्याप पर्यंत पोलीस प्रशासनाने या संदर्भात कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप रायपुरे यांनी यावेळी केला. या प्रकरणात विधीज्ञ  उपर्वट न्यायालयीन बाजू सांभाळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टिप्पण्या