Court news:cheque dishonor: धनादेश अनादर प्रकरणी महिलेला 2 लक्ष रुपये दंड व 3 महिन्याचा कारावास

In case of cheque dishonor, the woman was fined Rs 2 lakh and imprisoned for 3 months (file image)





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: दवाखान्याचे काम असल्याचे सांगून न्यायालयीन कर्मचारी असलेल्या एका महिलेने फिर्यादी कडून 2 लक्ष रुपये उसने घेतले होते. मात्र, वारंवार पैसे परत मागूनही मिळत नसल्याने अखेर फिर्यादीने न्यायालयात दाद मागितली. आज प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी बाळापुर यांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट कलम 138 नुसार गुन्हा सिद्ध झाल्याचे सांगुन आरोपीस दोन लक्ष पाच हजार रुपये दंड केला. व 3 महीने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. नुकसान भरपाई म्हणून दंडाची रक्कम फिर्यादीस देण्याचे आदेश पारीत केले.




असे आहे प्रकरण

फिर्यादी रविन्द्र रमेश दांदळे (खीरपुरी ता. बाळापुर) यांच्या कडून आरोपी महिला (चतुर्थ श्रेणी कर्मचारी जिल्हा न्यायालय अकोला.) हिने दवाखान्याचे कामाने 2 लक्ष रुपये उसने मागितले होते. फिर्यादीने आरोपीस दि.18 सप्टेंबर 2014 रोजी स्वतःचे बँक खात्यातून काढून दोन लक्ष दिले. रक्कम लवकरच परत देते, असे आश्वासन आरोपीने दिले. फिर्यादीने तीन-चार महीने नंतर आरोपीस दिलेल्या रकमेची मागणी केली. 




वारंवार मागणी केल्यावर आरोपीने दि 20-7-2015 चा दोन लक्ष रुपयाचा धनादेश दि अकोला मर्चंट को -ऑप या बँकेचा दिला. धनादेश देते वेळी सदरचा धनादेश नक्कीच वटविल्या जाईल, असे आश्वासन आरोपीने दिले. तो धनादेश फिर्यादीने स्वतःचे बँक खात्यात लावले असता न वटता 'पुरश्या निधी अभावी परत' अश्या बँक शेरासह परत आला.




यानंतर फिर्यादीने दि. 4-8-2015 रोजी ऍड. उमेशचंद्र बाहेती यांचे मार्फत रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवून रकमेची मागणी केली. परंतु आरोपीने रक्कम दिली नाही; म्हणुन फिर्यादीने बाळापुर येथील प्रथम श्रेणी यायदंडाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली. त्यामध्ये फिर्यादीने स्वतःचा व बँक अधिकारी यांचा पुरावा नोंदविला. आरोपीने स्वतःचा बचावाचा पुरावा नोंदविला. 




दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपलेवर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी बाळापुर यांनी आज 22 ऑक्टोबर रोजी आरोपी विरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट कलम 138 (पराक्रम्य लेख अधिनियम) नुसार गुन्हा सिद्ध झाल्याचे सांगुन आरोपीस दोन लक्ष पाच हजार रुपये दंड ठोठावला. व 3 महीने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. नुकसान भरपाई म्हणून दंडाची रक्कम दोन लक्ष पाच हजार रुपये फिर्यादीस देण्याचे आदेश पारीत केले. न्यायालयात फिर्यादीची बाजू वकील उमेशचंद्र बाहेती यांनी मांडली.


टिप्पण्या