Congress Working Committee meeting: पक्षात एकता आणि शिस्तीची गरज; कांग्रेस कार्य समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांचे वक्तव्य

The need for unity and discipline in the party; Statement by Sonia Gandhi at the Congress Working Committee meeting (photo:INC)





 


 


नवी दिल्ली: अनेक आव्हानाना तोंड देत काँग्रेस संघटना उभी आहे. आता संपूर्ण संघटनेला पुनरुज्जीवन करायचे आहे, परंतु यासाठी एकता आणि संघटना अन पक्षाचे हित सर्वोतोपरी असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी आत्म-नियंत्रण आणि शिस्त आवश्यक आहे, असे विचार आपल्या भाषणात काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केले.



काँग्रेस मुख्यालय येथे आज काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेत काँग्रेस कार्य समिती बैठक बोलाविण्यात आली होती.



काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांच्या सह काँग्रेसचे जवळपास ५२ महत्वपूर्ण आणि वरिष्ठ नेत्यांची बैठकीला उपस्थिती होती. या बैठकी नंतर काँग्रेस मध्ये काय फेर बदल होणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोना महासंकट काळानंतर काँग्रेस कार्यकारिणीची ही पहिलीच बैठक आहे,हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.




आगामी विधानसभा निवडणुका आणि लखीमपूर खेरी घटना बैठकीत अजेंड्यावर होत्या. या बैठकीत राजकीय आणि कृषीसह तीन ठराव पास करण्यावर विचार विनिमय झाला असल्याचे कळते.  







  

टिप्पण्या