coal production:national:India: कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी एनएलसी इंडिया लिमिटेड;पुढील वर्षापासून 4 दशलक्ष टनांवरून वार्षिक 20 दशलक्ष टन करण्याचा प्रयत्न

NLC India Ltd. seeks to increase coal production from 4 million tonnes to 20 million tonnes per annum from next year (file photo)





नवी दिल्‍ली,दि.13: एनएलसी इंडिया लिमिटेड, या सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न कंपनीच्या ओदिशा येथील 20 एमटीपीए तालाबिरा II आणि III ओपन कास्ट माईनने पहिल्या पूर्ण वर्षाच्या परिचालना दरम्यान आतापर्यंत 2 दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचा टप्पा ओलांडला असल्याचे कोळसा मंत्रालयाने म्हंटले आहे.


एनएलसी इंडिया लिमिटेडने चालू वर्षात आधीच्या 4 दशलक्ष टन उद्दिष्टाऐवजी वार्षिक 6 दशलक्ष टन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पावले उचलली आहेत आणि कोळशाची वाढती मागणी लक्षात घेऊन एनएलसी इंडिया लिमिटेड चालू वर्षात तालाबिरा खाणीचे कोळसा उत्पादन 10 दशलक्ष टन पर्यंत आणि पुढील वर्षापासून 20 दशलक्ष टन पर्यंत वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.


उत्पादित कोळसा एनएलसीआयएलची उपकंपनी तुतीकोरिन इथल्या एनएलसी तमिळनाडू पॉवर लिमिटेडच्या 2 x 500 मेगावॅट वीज निर्मिती संयंत्रांकडे नेला जात आहे. ही सगळी  निर्माण होणारी वीज दक्षिणी राज्यांची गरज भागवत असून यात तामिळनाडूचा मुख्य हिस्सा (40%पेक्षा जास्त) आहे.


कोळसा मंत्रालयाने खनिज सवलत नियमांबाबत खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) कायद्यात अलीकडेच सुधारणा केल्यामुळे, एन्ड यूज संयंत्राची कोळशाची गरज भागवल्यानंतर अतिरिक्त कोळसा विक्री खाणींना करता येते. त्यानुसार अतिरिक्त कोळसा विकण्यासाठी कोळसा मंत्रालयाकडे परवानगी मागण्यात आली आहे.


                     ******


औष्णिक विद्युतउत्पादन केंद्रांकडील कोळसा पुरवठ्याची नोंद; 2 दशलक्ष टनांहून जास्त कोळसा पुरवठा—प्रल्हाद जोशी


कोळसा पुरवठा अजून वाढवण्यासाठी प्रयत्नशील



Record of supply of coal from thermal power plants;More than 2 million tons of coal supply — Pralhad Joshi



Efforts to further increase coal supply




नवी दिल्‍ली,दि.13: सर्व उपलब्ध स्रोतांकडून औष्णिक विद्युतउत्पादन केंद्रांकडे येणारा कोळसा पुरवठा वाढल्याबद्दल केंद्रीय कोळसा, खनिकर्म आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आनंद व्यक्त केला आहे.


कोल इंडिया लिमिटेडसह इतर स्रोतांकडून होणारा एकूण कोळसा पुरवठा काल दोन दशलक्ष टनांपेक्षा जास्त नोंदवल्याचा ट्विट संदेश कोळसा मंत्र्यांनी केला आहे. विद्युत उत्पादन केंद्रांकडे पुरेसा कोळसा साठा असावा म्हणून या केंद्राकडे अधिक कोळश्याचा पुरवठा व्हावा याची काळजी घेतली जाईल असेही जोशी यांनी स्पष्ट केले आहे.

टिप्पण्या