break the chain: use of masks: मास्कचा वापर बंधनकारक..अन्यथा दंड: आजचे लसीकरण: गणेश महाविद्यालयात युवा स्वास्थ्य मिशन

The use of masks is mandatory ... otherwise fine




अकोला: ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत मार्गदर्शक सूचनेत निर्बंधासह शिथीलता देण्यात आली आहे. या शिथीलतेमुळे कोविड-19 संसर्गाचा फैलाव होवू नये याकरीता शासनाच्या दिशानिर्देशानुसार  जिल्ह्यातील सर्व प्रकारची शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांना मास्कचा वापर व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी 28 ऑक्टोबरला निर्गमित केले आहे.


आदेशात म्हटल्यानुसार,  अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजास्तव येणाऱ्या सर्व अभ्यागतांनाही कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक व तोंड पूर्णत: झाकले जाईल अशा पद्धतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील. अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधीत कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख, आस्थापना प्रमुख, प्रभारी अधिकारी यांनी करावी व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करून घ्यावे, ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करून कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करावे, जेणेकरून सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण होईल याची खातरजमा करावी.


            

सर्व प्रकारच्या कार्यालयीन आस्थापनांनी दैनंदिन कामकाजा दरम्यान मास्कचा सुयोग्य वापर तसेच लसीकरण पूर्ण करून घेणे, यावर देखरेख करण्यासाठी संबंधीत विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख हे आस्थापना अधिकारी किंवा अधिकाऱ्यास नामनिर्देशित करतील. अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यालयाच्या आवारात अभ्यागतांसह मास्कचा वापर अनिवार्य करण्यात येत असल्याने विनामास्क  वावरणाऱ्या अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी यांना संबंधीत अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी ज्या विभागाच्या क्षेत्रात, आवारात विनामास्क आढळला त्या कार्यालयाच्या नामनिर्देशित अधिकारी, कार्यालय प्रमुखाने नामनिर्देशित केलेले अधिकारी दंड करण्यास समक्ष प्राधिकारी राहील.


            

अकोला जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कार्यालयातील विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख यांनी त्यांचे कार्यक्षेत्राकरीता त्यांचे अधिनस्त असलेल्या कर्मचारी, अधिकारी यांना त्यांचे कार्यालयाच्या परिसरात विनामास्क आढळून येणाऱ्या अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी यांचेवर दंडात्मक कारवाई करण्याकरीता प्राधिकृत करावे.


            

सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कार्यालयामध्ये आढळून आलेल्या अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी हे विनामास्क आढळून आल्यास त्यांना 200 रूपये प्रत्येकी या प्रमाणे दंडाची आकारणी करावी. सक्षम प्राधिकारी विनामास्क आढळणाऱ्या अभ्यांगत, कर्मचारी, अधिकाऱ्यांना दंड आकारणी करून त्याबाबतची पावती देईल. सक्षम प्राधिकारी सदर दंडाची रक्कम संबंधीत कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे जमा करेल व आहरण व संवितरण अधिकारी यांनी दंडाची रक्कम महसूल जमा (सी) इतर कराव्यतिरिक्त महसूल एक सर्वसाधारण सेवा 0070-इतर प्रशासनीक सेवा 800 इतर जमा रक्कम लेखशिर्षाखाली जमा करावी.


           

अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यालयाच्या आवारात मास्क लावणे अनिवार्य राहील अशा प्रकारच्या सूचना दर्शनी भागात लाऊन तसेच सूचित करावे व अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी यांनी मास्क लावल्याशिवाय त्यांना प्रवेश देण्यता येऊ नये. नो मास्क नो एन्ट्री चे फलक दर्शनी भागावर लावण्यात यावे.


आदेशाची अंमलबजावणी करतांना कोविड-19 विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासनाने व स्थानिक प्रशासनाव्दारे वेळोवेळी  निर्गमित केलेले कोविड-19 संबंधित आदेश व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहिल.

                    ******


दिनांक 31/10/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.


1)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी 

2) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट

3) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

4) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना

5)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

6)नागरी आरोग्य केंद्र न्यू शिवाजी नगर शिवसेना वसाहत

मनपा शाळा

7) नागरी आरोग्य केंद्र खदान, शाळा क्र.16 आदर्श कॉलनी



 18+ च्या वरील  नागरिकांकरिता **Covishield*   प्रथम डोस तथा  द्वितीय डोस

पद्धतीने सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.


1)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड

2)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर

मनपा शाळा क्रमांक 22 

3)नागरी आरोग्य केंद्र उमरी 

श्री हरी पार्क लहान उमरी पोलीस स्टेशन जवळ


18+ च्या वरील  नागरिकांकरिता **Covexin*   प्रथम डोस तथा द्वितीय डोस) 

 सकाळी 09 ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.



ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी पासून सुरू राहील


*अकोला महानगरपालिका अकोला.

‌----------------------------------------


श्री गणेश कला महाविद्यालयात मिशन युवा स्वास्थ्य अभियान संपन्न



       

स्थानिक कुंभारी येथील श्री गणेश कला महाविद्यालयात नुकतेच 'मिशन युवा स्वास्थ्य अभियान' मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शासकीय निर्देशानुसार महाविद्यालयीन विद्यार्थी व कर्मचारी वर्गाला मोफत लसीकरण करण्यासाठी सदर अभियानाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आले होते. covid-19 या आजाराचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टिकोनातून आता प्रत्येकाला शारीरिक दृष्ट्या सक्षम होणे अत्यंत गरजेचे आहे, ही गरज लक्षात घेऊन 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण होणे अत्यावश्यक झाले आहे, ही बाब लक्षात घेऊन शासकीय निर्देशानुसार प्रत्येक महाविद्यालय आणि कार्यालयात शासनाच्या वतीने मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यातीलच एक भाग म्हणून 'मिशन युवा स्वास्थ्य अभियान' हा लसीकरण कार्यक्रम प्रत्येक महाविद्यालयात मोठ्या उत्साहाने व जोमाने साजरा केल्या जात आहे. त्याच अनुषंगाने श्री गणेश कला महाविद्यालया कुंभरी येथे सदर अभियान मोठ्या उत्साहात नुकतेच संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा माजी अध्यक्ष विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर चे प्रा. तुकाराम भाऊ बिडकर हे उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी चव्हाण या उपस्थित होत्या. याप्रसंगी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. व्ही. मेहरे तसेच वैद्यकीय चमू अनिताताई घुले - आरोग्य सेविका, शिवमाला मोरखडे - गट र्प्रवर्तक, आशिष देवळे - आरोग्य सेवक, अलका नागे - आशा सेविका, मीरा साबळे - आशा सेविका, इ. प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजनेचे आराध्यदैवत वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक पर भाषणातून कार्यक्रमाच्या आयोजनामागील हेतू मराठी विभाग प्रमुख तसेच रा.से.यो. सह कार्यक्रम अधिकारी प्रा. रश्मी दहापुते यांनी उपस्थितांना समजावून सांगितला. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी चव्हाण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. के. व्ही. मेहरे यांनी आपले विचार व्यक्त करताना उपस्थितांना लसीकरण करून घेण्याचे मनःपूर्वक आवाहन केले व उपस्थित वैद्यकीय चमू चे आभार देखील मानले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रा. तुकाराम भाऊ बिडकर यांनी आपल्या खुमासदार शैलीतून उपस्थितांना सुंदर मार्गदर्शन करत लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. महाविद्यालयाच्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत एकही लस घेतली नाही अशा विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने लसीकरण करण्यात आले. लसीकरणाचा लाभ विद्यार्थ्यांच्या नातेवाईक तसेच महाविद्यालयीन परिसरातील ग्रामस्थांनी देखील मोठ्या प्रमाणात घेतला. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सुद्धा लसीकरणाचा लाभ घेतला. मोफत लसीकरण अभियानात विद्यार्थी,पालक वर्ग, परिसरातील नागरिक वर्ग यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या रा.से.यो. विभागातर्फे लसीकरण झालेल्या सर्व विद्यार्थी व नागरिकांना चहा व बिस्किटाचे  वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांचे पालक तसेच परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक केले व असे कार्यक्रम महाविद्यालयात वेळोवेळी घेण्याची उपस्थित प्राध्यापक वृंदाना तसेच प्राचार्य महोदयांना विनंती केली. कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थी रा.से.यो.चे स्‍वयंसेवक विद्यार्थी, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थ्यांचे पालक वर्ग तसेच महाविद्यालयीन परिसरातील रहिवासी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी covid-19 चे शासनाने घालून दिलेले सर्व निर्देश तन्मयतेने पाळले.अभियाना दरम्यान लसीकरण संनियंत्रक, श्री.उमेश ताठे यांनी महाविद्यालयाला भेट देऊन कार्यक्रमाची पाहणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीत विभागाचे प्रा. सुधाकर मनवर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. श्री. राजदत्त मानकर यांनी मानले.





टिप्पण्या