- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akola newsletter:World Egg Day: जागतिक अंडी दिन: मानवी आहारातील अंड्यांच्या महत्त्वाबाबत जागृती; 'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे'
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला. दि.८: जागतिक अंडी दिन निमित्त अंड्यातील मानवी आहारातील महत्त्व व त्यातील पोषण मूल्य याबाबत जागृती करुन स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेने जागतिक अंडी दिन साजरा केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता प्रा.डॉ.चैतन्य पावसे हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुक्कुट पालन विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. सतिष मनवर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात डॉ. मनवर यांनी जागतिक अंडी दिनाचे महत्त्व विषद केले. तर डॉ. पावसे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचे महत्त्व विषद केले. डॉ. मिलिंद दुसाने यांनी मानवी आहारात अंड्यांचे महत्त्व सांगतांना आहाराबाबत असणारे अज्ञान व त्याच्याशी निगडीत कुपोषण व अतिपोषण यासारख्या समस्यांवर प्रकाश टाकला. अंडे हे कोणत्याही प्रकारे भेसळ न होऊ शकणारे सकस आहार असल्याने अंड्यांच्या आहारातील समावेशाला चालना द्यावी,असेही त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन समन्वयक डॉ. मंगेश वडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सह समन्वय डॉ. प्रशांत कपाले यांनी केले. यावेळी डॉ.मिलिंद थोरात, डॉ. सुनील वाघमारे, डॉ. राऊळकर, डॉ. इंगोले, डॉ. किशोर पजई, डॉ. शैलेंद्र कुरळकर, डॉ. प्राजक्ता कुरळकर आणि विद्यार्थी वर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते.
तीन पॉझिटीव्ह;दोन डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेनमध्ये शुन्य पॉझिटीव्ह
अकोला: आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ३६९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३६६ अहवाल निगेटीव्ह, तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.७) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्येही कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७८६८(४३२६२+१४४२९+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर तीन + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह तीन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३२४४९८ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३२०८७० फेरतपासणीचे ४०२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३२२६ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३२४४९८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २८१२३६ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
तीन पॉझिटिव्ह
आज दिवसभरात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन महिला व एका पुरुषाचा समावेश असून ते दोन अकोला ग्रामीण तर एक अकोला मनपा क्षेत्रातील आहे. दरम्यान रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला, याची नोंद घ्यावी.
दोन जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात होम आयसोलेशन येथील दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
१५ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७८६८(४३२६२+१४४२९+१७७) आहे. त्यात ११३७ मृत झाले आहेत. तर ५६७१६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १५जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
शांतता समिती बैठक
अकोला: आगामी सण उत्सव काळात विविध धार्मिक- सामाजिक संस्था संघटनांनी आपापल्या भागातील लोकांचे कोविड लसीकरण करुन घेण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे शांतता समितीच्या बैठकीत केले.
आगामी काळातील सण उत्सवांच्या काळात जिल्ह्यात कोविड या विषाणूजन्य आजाराच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट रितू खोखर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो- पटोकार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांची उपस्थिती होती.
बैठकीत सुरुवातील शासनाने दिलेल्या निर्देशांची माहिती समिती सदस्यांना संजय खडसे यांनी करुन दिली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील नागरिकांन सण उत्सव काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले. तर जिल्हाधिकारी अरोरा म्हणाल्या की, विविध धार्मिक मंडळांनी आपापल्या भागात लसीकरणाचे आवाहन करुन लोकांनी लसीकरण करुन घ्यावे यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. डॉ. वंदना वसो- पटोकार म्हणाल्या की, दुर्गा मंडळांनी मागणी केल्यास त्यांच्या भागातील नागरिकांसाठी स्वतंत्र सत्र लसीकरण केंद्रावर आयोजित करुन देऊ. याबैठकीचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन संजय खडसे यांनी केले.
मिशन कवच कुंडलःदिवाळीपूर्वी अधिकाधिक लोकांच्या लसीकरण होणे अपेक्षित
अकोला: मिशन कवच कुंडल अंतर्गत कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी दिवाळीच्या आत अधिकाधिक लोकांचे लसीकरण व्हावे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा, त्यासाठी उपविभागीय अधिकारी ते गावातील ग्रामसेवक तलाठी, आशा, अंगणवाडी सेविका या सर्व यंत्रणेनी समन्वय राखून प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यातील कोविड लसीकरण सद्यस्थितीबाबत आज आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यत दररोज एका लसीकरण केंद्रावर १५० जणांचे लसीकरण झाल्यास हे अभियान यशस्वी करता येईल. सद्यस्थितीत जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी यंत्रणे अंतर्गत अकोला तालुक्यात ३२, अकोट १५, बाळापूर १६, बार्शी टाकळी १७, तेल्हारा १०, मुर्तिजापुर १५, पातूर १२ असे ११७ लसीकरण केंद्र आहेत. तर जिल्हा रुग्णालय अंतर्गत ग्रामिण रुग्णालय अकोट,चार, बाळापूर पाच, बार्शी टाकळी दोन, तेल्हारा दोन, चतारी एक, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर दोन, उपकेंद्र नंदीपेठ ३, गोलबाजार २, आयएमए हॉल येथे १, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय प्रत्येकी एक असे २४ सत्र तर मनपा आरोग्य यंत्रणेचे १०- असे जिल्ह्यात एकूण १५१ सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा