Akola newsletter:अकोला बातमीपत्र: भागवत कथा मानव कल्याण्याच्या कामना पूर्ण करणारी- दायमा महाराज

  दायमा महाराज भागवत कथा सांगताना 




अकोला: भागवत कथा मनुष्याच्या सुखदुःख सोबत मानव कल्याणाच्या कामना पूर्ण करणारी पूर्वजांना मोक्षदायक असल्याचे प्रतिपादन भागवताचार्य ज्योतिषाचार्य विजय प्रकाश दायमा यांनी केले.




अकोला येथे आयोजित भागवत कथेचा महत्त्व विशद करताना विजय प्रकाश दायमा यांनी भगवान श्रीकृष्णाच्या व विष्णू या विविध अवतार संदर्भात व महत्व वेगवेगळे फलदायक भगवान अवतार यांचे वर्णन सरळ आणि सोप्या भाषेत वर्णन केले.


भगवंताचे श्रवण केल्याने मानव कल्याण झाल्या शिवाय राहत नाही. भागवत कथा चे आयोजन श्रवण मनन करून आपल्या कल्याणा सोबत आपल्या सात पिढीचा उद्धार करून घ्यावा. मनाला आनंददायी भगवत कथा दिशादर्शक असल्याचेही यावेळी दायमा महाराज यांनी सांगितले. यासंदर्भात अनेक उदाहरण देवून भक्तांना मंत्रमुग्ध केले.  




यावेळी पुरखाराम चौधरी, जिवाजी चौधरी आदींनी महाराजांचे स्वागत केले. अनिल मानधने, हिम्मत राम चौधरी, गिरीश जोशी आदींनी भक्तांची व्यवस्था सांभाळली.


                  ******



थकबाकी कमी करण्यासाठी कंपनीच्या प्रयत्नांना स्वयंसेवी संस्थांनी साथ देण्याची आवश्यकता- पवनकुमार कछोट



अकोला दि. २०: वीज वितरण कंपनीने गो - ग्रीन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इतर योजनांच्या माध्यमातून ग्राहका कडील थकबाकी कमी करण्यासाठी कंपनी करीत असलेल्या प्रयत्नांना एनजीओ व इतर स्वयंसेवी संस्थांनी साथ देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.



ग्राहकांकडून वसूल होणाऱ्या महसुलातील अधिकांश रक्कम त्यांच्या भागातील विद्युत वितरण सुधारणेसाठी वापरण्यात येणार असल्यामुळे जास्तीत जास्त थकबाकी वसूल करण्यासाठी विद्युत ग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय आवश्यक  आहे असे त्यांनी सांगितले. ७५ हजार कोटी रुपयांची वीज बिलांची थकबाकी असताना कंपनीला व्यवस्था सुचारू करण्यासाठी ४५ हजार कोटीचे कर्ज काढावे लागले याकडे श्री कछोट यांनी लक्ष वेधले.



इंडियन रेड क्रॉस सोसायटी मध्ये विविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यां समवेत आयोजित सभेत श्री कछोट बोलत होते. 



अजीत दिनोरे यांची विद्युत वितरण कंपनीत कार्यकारी अभियंता म्हणून बढती झाल्याबद्दल यावेळी रेड क्रॉस तर्फे शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.




कोरोनासारख्या कठीण काळात अखंड वीजपुरवठा देऊन कर्मचाऱ्यांनी भरीव कामगिरी केली असून त्यांनी देखील कोरोना योद्धा म्हणून सन्मान दिला पाहिजे, असे रेड क्रॉसचे उपाध्यक्ष डॉक्टर किशोर मालोकार यांनी प्रास्ताविकात सांगितले.




पाहुण्यांचे स्वागत अमर गौड, एडवोकेट महेंद्र साहू, डॉक्टर एन के माहेश्वरी, अभियंता पंकज मराठे आदींनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रभजीत सिंह बछेर यांनी तर आभार प्रदर्शन सीएमनो चांडक यांनी केले.




.



                कोरोना अलर्ट


*आज बुधवार दि.२० ऑक्टोबर २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

 

*प्राप्त अहवाल-९६*

*पॉझिटीव्ह-एक*

*निगेटीव्ह-९५* 


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य= एकूण पॉझिटीव्ह- एक


*अतिरिक्त माहिती* 


आज  दिवसभरात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एका पुरुषाचा समावेश असून ते मूर्तिजापूर तालुक्यातील रहिवासी आहे.


दरम्यान आज दिवसभरात होम आयसोलेशन येथील पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आले.


*आता सद्यस्थिती*


*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-४३२७१+१४४३०+१७७=५७८७८*

*मयत-११३९*

*डिस्चार्ज-५६७२१*

*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-१८* 


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त  माहितीनुसार) 


मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!


******



लसीकरण कार्यक्रम


21/10/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.


1)नागरी आरोग्य केंद्र खदान आदर्श कॉलनी 16 नंबर शाळा नागरी 

2)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी 

3) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

4) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना

5)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी 

6)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

7) GMC अकोला

8) IMA hall सिव्हिल लाईन चौक, अकोला 

9)नागरी आरोग्य केंद्र न्यू शिवाजी नगर शिवसेना वसाहत

मनपा शाळा

10) आर  के टी आयुर्वेदिक महाविद्यालय जठारपेठ


 18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covishield(*100 ऑनलाइन अपॉइंटमेंट  प्रथम डोस तथा  द्वितीय डोस) [ 200 कूपन   प्रथम डोस तथा द्वितीय डोस ]साठी

पद्धतीने सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.


1)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड

2) लेडी हार्डिंग DHW

3)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर

मनपा शाळा क्रमांक 22 


18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covaxin (* 100ऑनलाइन अपॉइंटमेंट  प्रथम डोस तथा द्वितीय डोस) [  200कूपन  प्रथम तथा  द्वितीय डोस ]साठी

 सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.


ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील


अकोला महानगरपालिका अकोला.

                     ******

टिप्पण्या