Akola news letter: वाचनालय व व्यायामशाळा उभारुन साकारणार शहीद निलेश धांडे यांचे स्मारक-पालकमंत्री ना. बच्चू कडू व इतर विशेष वृत्त

Martyr Nilesh Dhande's memorial to be set up by building library and gymnasium 





अकोला, दि.१२: देशासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान करणे ही सोपी गोष्ट नाही. ज्याने देशाला सर्वस्व दिले त्याला आपण काय देणार. शहीदांच्या स्मृती जागवण्यासाठी  त्यांच्या बलिदान भावनेचा आदर करणे आवश्यक आहे.  युवा पिढी पुढे त्यांचे आदर्श सतत सामोरे ठेवले पाहिजे. त्यासाठी वरुर जऊळका गावात  एक चांगले वाचनालय व व्यायामशाळा उभारुन शहीद निलेश धांडे यांचे स्मारक साकारले जाईल, जेणेकरुन चांगली मने व बलदंड शरीराचे युवक देशासाठी घडले पाहिजे,असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी वरुर जऊळका येथे सोमवारी (दि.११) केले.




वरुर जऊळका ता. अकोट येथील रहिवासी असलेले भारतीय सीमा रस्ते संघटनमधील  शहीद सैनिक निलेश प्रमोद धांडे यांच्या श्रद्धांजली सभेस पालकमंत्री ना. कडू संबोधित करत होते. यावेळी ना. कडू यांनी शहीद धांडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट ही घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, रवी ढोके तसेच धांडे कुटुंबीय  व शहीद निलेश यांचे आई वडील उपस्थित होते. येथील गजानन मंदिराच्या सभागृहात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी ग्रामस्थांच्या वतीने स्व.निलेश यांच्या पत्नीला सेवेत घेण्यात यावे तसेच शहीद निलेश यांचे यथोचित स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली.




यावेळी ग्रामस्थांना संबोधित करतांना पालकमंत्री कडू म्हणाले की, मृत्यू मृत्यूत फरक असतो. देशासाठी बलिदान करत आलेलं वीर मरण सर्वात श्रेष्ठ. एक दिवसाची श्रद्धांजली वाहण्यापेक्षा शहीदांनी केलेल्या त्याग व बलिदानाचा आदर करण्याची भावना आयुष्यभर जपली पाहिजे. वेगवेगळ्या झेंड्यांसाठी लढण्यापेक्षा देशाच्या तिरंग्यासाठी एकजूट होणे आवश्यक. प्रत्येक तरुणाने, नागरिकाने देशप्रेमाची भावना जागवली पाहिजे. आपल्या देशाचा माणूस सुखी व्हावा, सुरक्षीत रहावा म्हणून निलेश धांडे हे शहीद झाले. त्यांच्याप्रमाणे देशासाठी त्याग मनोभावना युवकांमध्ये तयार झाली पाहिजे, त्यासाठी  अत्याधुनिक व्यायामशाळा व उत्तम वाचनालय याठिकाणी उभारु, तेच शहीद निलेश धांडे यांचे यथोचित स्मारक होईल. शहीद निलेश धांडे यांच्या परिवाराला शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळेलंच. मात्र, ज्याने देशाला देह दिला त्याला काही देणारे तुम्ही आम्ही कोण? असा परखड सवाल त्यांनी केला. इमानदारी, बलिदान आणि कर्तृत्व यानेच माणूस मोठा होतो. शहीदांच्या कुटुंबियांना सन्मान द्या. शहीदांचा सन्मान म्हणून व्यसनांचा त्याग करा. शहीदांचा सन्मान म्हणून गावात एकजूट झाली पाहिजे. त्यातून  गावाच्या विकासासाठी करण्याचा गावकऱ्यांनी  संकल्प करावा,असे मत ना. कडू यांनी यावेळी मांडले.


यावेळी ना. कडू हे स्वतः शहीद निलेश धांडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना भेटले. त्यांचे सांत्वन केले.  शहीद निलेश धांडे हे नागालँडच्या दिमापूर शहर सीमेजवळ सिमा रस्ते संघटनच्या ग्रिप पायलर या पदावर सन २०१३ पासून कार्यरत होते. नागालँड येथे कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आले.त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, दिड वर्षाचा मुलगा व पत्नी असा परिवार आहे.





                      ******

गुन्हेगारी टोळी दोन वर्षाकरिता हद्दपार; जिल्हा व सत्र न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती 


Criminal gang deported for two years;  Interim stay granted by District and Sessions Court

 


अकोला : स्थानिक डाबकी रोड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका कुटुंबावर अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी गुन्हेगारी टोळी संबोधत दोन वर्षाकारिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. त्या हद्दपार आदेशावर जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली असल्याने अभंग कुटुंबियांना न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. 




जिल्ह्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जोगळेकर प्लॉट येथील रहिवासी गजानन अभंग,अनुराग अभंग, ज्ञानेश्वर अभंग, रोहितकुमार अभंग यांच्या विरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गुन्हेगारी टोळी म्हणून अभंग परिवारातील सर्वच पुरुष सदस्यांना दोन वर्षाकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जारी केले होते. सदर आदेशाला अभंग कुटुंबीयांनी जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले. जिल्हा व सत्र न्यायालयाने अभंग कुटुंबियांची बाजू ऐकून या प्रकरणी हद्दपार आदेशावर अंतरिम स्थगिती देत अभंग कुटुंबियांना दिलासा दिला आहे. या प्रकरणी अभंग कुटुंबियांतर्फे अ‍ॅड. पियुष अटल यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.




                      ******

मौजे चेलका व मौजे कातखेडा येथील मंदीर परिसरात प्राणी कत्तलीस निर्बंध


Restrictions on animal slaughter in the temple premises at Mauje Chelka and Mauje Katkheda


अकोला, दि.१२: मौजे चेलका व मौजे कातखेडा येथील मंदिरात नवरात्रोत्सवात देवीच्या मंदीराच्या २०० मिटर परिसरात   बोकड बळी देण्यास तसेच  प्राण्यांची कत्तल करण्यास निर्बंध घालण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत. हे निर्बंध दि.१२ ते १५ या कालावधीसाठी असून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) व १४४(२) अन्वये हे आदेश निर्गमित करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. या आदेशाच्या अनुषंगाने  उपविभागीय दंडाधिकारी मुर्तिजापूर यांनी  आवश्यक ती कार्यवाही करावी,असे निर्देश अपर जिल्हादंडाधिकारी संजय खडसे यांनी दिले आहेत.



                     ******

आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टीजेनमध्ये शुन्य पॉझिटीव्ह


अकोला,दि.12: आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे(आरटीपीसीआर) 222 अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.


त्याच प्रमाणे काल (दि.11) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्येही कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57871(43265+14429+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह शुन्य  


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 325233 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 321603 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3228 नमुने होते. आजपर्यंत एकूण 325233 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 281968  आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


शून्य पॉझिटिव्ह


आज  दिवसभरात  आरटीपीसीआर व  रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, याची नोंद घ्यावी.


17  जणांवर उपचार सुरु


जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57871(43265+14429+177) आहे. त्यात 1138 मृत झाले आहेत. तर 56716 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 17 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.


रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 111 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह


कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.11) दिवसभरात झालेल्या 111  चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.


            

काल दिवसभरात मुर्तिजापूर येथे एक, अकोला महानगरपालिका क्षेत्रात येथे 52,जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 21, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 30, हेगडेवार लॅब येथे सात चाचण्या,  अशा एकूण 111 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.




लसीकरण

उद्या दिनांक 13/10/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.


1)नागरी आरोग्य केंद्र खदान आदर्श कॉलनी 16 नंबर शाळा नागरी 

2)   मनपा शाळा क्रमांक 3 व 4 (टेम्पल गार्डन शाळा)प्रांगणात

रामदासपेठ पोलिस स्टेशनच्या बाजूला 

3) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

4) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना

5)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी 

6)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

7) GMC अकोला

8) IMA hall सिव्हिल लाईन चौक, अकोला 

9) नागरी आरोग्य केंद्र न्यु शिवाजी नगर शिवसेना वसाहत मनपा शाळा

10) जिल्हा परिषद शाळा कौलखेड गजानन महाराज मंदिर च्या पाठीमागे

11) आर के टी आयुर्वेदिक कॉलेज जठारपेठ 

12) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट जवळ


18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covishield(*100 ऑनलाइन अपॉइंटमेंट  प्रथम डोस तथा  द्वितीय डोस) [ 200 कूपन   प्रथम डोस तथा द्वितीय डोस ]साठी

पद्धतीने सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.


1)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड

2) लेडी हार्डिंग DHW

3)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर

मनपा शाळा क्रमांक 22 

4) मोहम्मद अली रोड ताजना पेठ पोलीस चौकी

5) गौतम नगर जुना आरटीओ रोड

6) मलेरिया कॉलनी कौलखेड


18+ च्या वरील  नागरिकांकरिता Covexin (100ऑनलाइन अपॉइंटमेंट  प्रथम डोस तथा द्वितीय डोस) 

[  200कूपन  प्रथम तथा  द्वितीय डोस] साठी

 सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.



ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी पासून सुरू राहील


अकोला महानगरपालिका अकोला.

टिप्पण्या