Akola news letter: अकोल्यात आज पण आरटीपीसीआर आणि रॅपिड चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह. व इतर महत्वपूर्ण बातम्या वाचा…



*उद्याचे लसीकरण
*अतिवृष्टी: सतर्कतेचा इशारा
*विसर्ग अलर्ट
*मुख्यध्यापक सहविचार सभा
*जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांचा सत्कार




अकोला,दि.2:  आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 289 अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.


त्याच प्रमाणे काल (दि.1) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57860(43254+14429+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह शुन्य


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 323008 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 319384 फेरतपासणीचे 402  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3222 नमुने होते. आजपर्यंत एकूण 323008 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 279754 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


शुन्य पॉझिटिव्ह


आज  दिवसभरात आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, याची नोंद घ्यावी.


13 जणांवर उपचार सुरु


जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57860(43254+14429+177) आहे. त्यात 1137 मृत झाले आहेत. तर 56710 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 13 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.


रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 139 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह


 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.1) दिवसभरात झालेल्या 139 चाचण्या झाल्या त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.


            

काल दिवसभरात मुर्तिजापूर येथे दोन, अकोला महानगरपालिका येथे 104, जिल्हा आरोग्य कर्मचारी चार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 20, हेगडेवार लॅब येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 139 जणांच्या चाचण्या होऊन त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला.



उद्या दिनांक 03/10/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.


1)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी 

2) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट

3) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना

4) IMA hall सिव्हिल लाईन चौक, अकोला 


 18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covishield(*100 ऑनलाइन अपॉइंटमेंट  प्रथम डोस तथा  द्वितीय डोस) [ 200 कूपन   प्रथम डोस तथा द्वितीय डोस ]साठी

पद्धतीने सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.


1) लेडी हार्डिंग DHW

2)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर

मनपा शाळा क्रमांक 22 


18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covaxin (* 100ऑनलाइन अपॉइंटमेंट  प्रथम डोस तथा द्वितीय डोस) [  200कूपन  प्रथम तथा  द्वितीय डोस ]साठी

 सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.



ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील


*अकोला महानगरपालिका अकोला.

‌----------------------------------------



अतिवृष्टी: सतर्कतेचा इशारा



अकोला,दि.2: हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार बुधवार (दि.6 ऑक्टोंबर) पर्यंत अतिवृष्टी व विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.


जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प मोठया प्रमाणात जलसाठा झालेला असुन पाण्याची आवक वाढल्यास कोणत्याही वेळी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो.  अशा स्थितीत सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.



विसर्ग अलर्ट


काटेपूर्णा प्रकल्प     

                               

आज दि. *०२/१०/२०२१* रोजी *रात्री  12.15* वाजता काटेपूर्णा  प्रकल्पातुन नदीपात्रात होत असलेला विसर्ग *255.829 घ.मी./से.*  वरून वाढवून  *498.342 घ.मी./से.*  एवढा करण्यात आला आहे. प्रकल्पाची एकूण   *१० वक्रद्वारे* प्रत्येकी *60 cm उंचीने*  उघडुन  नदीपात्रात   विसर्ग सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील   नागरिकांनी  सावध राहावे. 

        


  काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष



घुंगशी ब्यारेज-दि 02/10/21 रोजी सकाळी 6.00 वा ,सध्या पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे ब्यारेज ची सर्व व्दारे वर उचलून ठेवण्यात आली आहेत नदीपात्रात 09 गेट मधून पूराचे पाणी वाहत आहे पाण्याची पातळी 255.00 मी असुन पूर  विसर्ग 497 घमीप्रसें आहे



1) दगड पारवा प्रकल्प    

Date..02/10/2021

317.20MTR ,  10.19MM3, 100%  RF 48 MM , TRF 847MM. 1 gate open hight 2.50 cm dis 2.05. cumecs. 



वान प्रकल्प


आज दि. ०२/१०/२०२१ रोजी सकाळी ०६:३० वाजता वान  प्रकल्पाचे  एकूण २ वक्रद्वारे प्रत्येकी ३० cm उंचीने उघडण्यात येणार असून नदीपात्रात एकूण  ५३.८० घ.मी./से  एवढा विसर्ग सोडण्यात येणार आहे.पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील   नागरिकांनी  सावध राहावे


*Wan Project*

Time 06:30 Am

Level :- 411.80

Storage :- 80.98 Mm3

Percentage :- 98.81 %


 वान  प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष


तुळजापूर लपा प्रकल्प

पातूर. दिनांक *02/10/2021* रोजी सकाळी 07: 00 वाजता तुळजापूर  प्रकल्पा चा पाणी साठा  *100* % झाला असून 3 cm सांडवा होत आहे.




विसर्ग अलर्ट

*खड़कपूर्णा प्रकल्प, दे. मही*

*दि. 2-10-2021*

*वेळ: 7.30 am Hrs.*

जलाशय पाणीपातळी= 520.25    मी.

जीवंत पाणी साठा =86.14

जीवंत साठा टक्केवारी= 92.23%


आज *दि. 2-10-2021 रोजी  7.30 am वाजता*  खड़कपूर्णा  प्रकल्पाचे 7 द्वार 0.5 मीटरने  उघडण्यात आले आहे.

 *सद्यस्थितीत प्रकल्पाचे 7 द्वार  0.5 मीटरने चालू असून एकूण=  12729.25cusec क्यूसेक्स(360 cumec】 विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.*


धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.


नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे


*खड़कपूर्णा प्रकल्प, पूर नियंत्रण कक्ष*

Purna Barrage-2(Ner Dhamna)

Dt. 02/10/2021 @ 8.00 A.M

Level -239.00

Gate- 12 Open(All)

Discharge- 3 gate only )150.60.घमीप्रसे.



दिनांक

02/10/2021

वेळ : 10.00 AM वाजता 

मोर्णा नदी 

नदी पातळी ...270.40 M.

उंची.........  1.80 M.

विसर्ग....... 327.03 Cumecs



विसर्ग अलर्ट

*खड़कपूर्णा प्रकल्प, दे. मही*

*दि. 2-10-2021*

*वेळ: 10.30 am Hrs.*

जलाशय पाणीपातळी= 520.25    मी.

जीवंत पाणी साठा =86.14

जीवंत साठा टक्केवारी= 92.23%


आज *दि. 2-10-2021 रोजी  7

10.30 am वाजता*  खड़कपूर्णा  प्रकल्पाचे 11 द्वार 0.5 मीटरने  उघडण्यात आले आहे.

सद्यस्थितीत प्रकल्पाचे 11 द्वार  0.5 मीटरने चालू असून एकूण=  20003.1cusec क्यूसेक्स(566.5cumec】 विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.*


धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.


नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे


खड़कपूर्णा प्रकल्प, पूर नियंत्रण कक्ष*



काटेपूर्णा प्रकल्प

                                  

आज दि. *०२/१०/२०२१* रोजी *दुपारी  १.३०* वाजता काटेपूर्णा  प्रकल्पातुन नदीपात्रात होत असलेला विसर्ग *४९८.३४२ घ.मी./से.*  वरून कमी करून  *३५२.८२ घ.मी./से.*  एवढा करण्यात आला आहे. प्रकल्पाची एकूण   *६ वक्रद्वारे* प्रत्येकी *30 cm उंचीने*  व *४ वक्र द्वारे* *६० cm* उंचीने उघडुन  नदीपात्रात   विसर्ग सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील   नागरिकांनी  सावध राहावे. 

       


 काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष


दिनांक

02/10/2021

वेळ : 2.30 PM वाजता 

मोर्णा नदी 

नदी पातळी ...270.40 M.

उंची.........  1.80 M.

विसर्ग....... 327.03 Cumecs



Purna Barrage-2(Ner Dhamna)

Dt. 02/10/2021 @ 4.00 P.M

Level -243.00

Gate- 12 Open(All)

Discharge- 12 gate only )4127.00.घमीप्रसे.



काटेपूर्णा प्रकल्प

                                    

आज दि. *०२/१०/२०२१* रोजी *दुपारी  ३.१५* वाजता काटेपूर्णा  प्रकल्पातुन नदीपात्रात होत असलेला विसर्ग *२५५.८२९ घ.मी./से.*  वरून कमी करून *१०२.३३ घ.मी./से.*  एवढा करण्यात आला आहे. प्रकल्पाची एकूण   *४ वक्रद्वारे* प्रत्येकी *30 cm उंचीने*  उघडुन  नदीपात्रात   विसर्ग सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील   नागरिकांनी  सावध राहावे. 

      


 काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष


विसर्ग अलर्ट

*खड़कपूर्णा प्रकल्प, दे. मही*

*दि. 2-10-2021*

*वेळ: 4.30 pm Hrs.*

जलाशय पाणीपातळी= 520.25    मी.

जीवंत पाणी साठा =86.14

जीवंत साठा टक्केवारी= 92.23%


आज *दि. 2-10-2021 रोजी  4.30 pm वाजता*  खड़कपूर्णा  प्रकल्पाचे 15 द्वार 0.5 मीटरने  उघडण्यात आले आहे.

 *सद्यस्थितीत प्रकल्पाचे 15 द्वार  0.5 मीटरने चालू असून एकूण=  27276 cusec क्यूसेक्स(772cumec】 विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.*


धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.


नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे


*खड़कपूर्णा प्रकल्प, पूर नियंत्रण कक्ष*

1) दगड पारवा प्रकल्प   

Time..5.00pm 

Date..02/10/2021

317.20MTR ,  10.19MM3, 100%  2 gate  open hight 2.50 cm dis 4.10. cumecs. 


 दिनांक

02/10/2021

वेळ : 5.30 PM वाजता 

मोर्णा नदी 

नदी पातळी ...270.20 M.

उंची.........  1.60 M.

विसर्ग....... 275.37 Cumecs



विसर्ग अलर्ट


*खड़कपूर्णा प्रकल्प, दे. मही*

*दि. 2-10-2021*

*वेळ: 8.45 pm Hrs.*

जलाशय पाणीपातळी= 520.25    मी.

जीवंत पाणी साठा =86.14

जीवंत साठा टक्केवारी= 92.23%


आज *दि. 2-10-2021 रोजी  8.45 pm वाजता*  खड़कपूर्णा  प्रकल्पाचे 19 द्वार 0.5 मीटरने  उघडण्यात आले आहे.

 *सद्यस्थितीत प्रकल्पाचे 19 द्वार  0.5 मीटरने चालू असून एकूण=  34550.8cusec क्यूसेक्स(978.5cumec】 विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.*


धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.


नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे


*खड़कपूर्णा प्रकल्प, पूर नियंत्रण कक्ष



 



व्याळा व वाडेगाव केंद्राची संयुक्त मुख्याध्यापक सहविचार सभा 





१ ऑक्टोबर २०२१ रोजी श्री. भाऊसाहेब तिरुख विद्यालय ,खिरपुरी बुद्रुक येथे व्याळा व वाडेगाव केंद्राची मुख्याध्यापकांची सहविचार सभा संपन्न झाली. सभेला प्रमुख पाहुण्या म्हणून अकोला जिल्ह्याच्या  नुतन माध्यमिक शिक्षण अधिकारी माननीय  डॉ. सौ. सुचीताताई पाटेकर मॅडम लाभल्या होत्या. तसेच  उपशिक्षणाधिकारी माध्यमिक मा. श्री. दिलीप तायडे  व बाळापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी  गौतम बडवे  रिझर्व मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष बळीराम झांबरे सचिव दिनेश काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली अकोला जिल्हाच्या नुतन माध्यमिक शिक्षणाधिकारी  डॉ.  सुचीताताई पाटेकर यांचे शाल , श्रीफळ व  पुस्तक देऊन गौतम  बडवे व  डी आर पवार केंद्रप्रमुख व्याळा यांनी  स्वागत केले. तसेच मुख्याध्यापीका  कल्पना धोत्रे  , भाऊसाहेब तिरुख विद्यालय, खिरपुरी बु यांच्या वतीने ही शाल व श्रीफळ देऊन तसेच मास्क देऊन  सुचीताताई पाटेकर  यांचे स्वागत करण्यात आले.  उपशिक्षणाधिकारी माध्यमिक  दिलीप तायडे साहेब यांचे स्वागत जागेश्वर विदया. मु अ श्री मसने , केंद्र मु अ व्याळा ज्ञानदेव गावंडे  यांनी केले.  गटशिक्षणाधिकारी बाळापुर  गौतम बडवे  यांचे स्वागत समाधान सोर मु अ यांनी व श्री मनोहर आखरे यांनी केले. शाळेच्या मु अ कल्पना धोत्रे यांचा सत्कार ज्योती कदम  व देहानकर  यांनी केला. तसेच डॉ पाटेकर मॅम यांचा पुस्तक देवून सत्कार जि प शिक्षक पतसंस्थेचे संचालक तथा मु अ प्रशांत आकोत  व दिलीप तायडे यांचा सत्कार देवेंद्र सोसे यांनी केला. स्वागत समारंभानंतर नुतन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांच्या कार्याचा परिचय केंद्रप्रमुख डी आर पवार  यांनी करून दिला .  


मुख्याध्यापक सभेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट करीत दोन्ही केंद्रांची आधार अपडेशनची स्थिती, ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाची स्थिती संख्यात्मक विश्लेषण स्पष्ट केले.


  *समस्या  निराकरण* 

                                      

नंतर भाऊसाहेब तिरूख विद्यालयाचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र तिरुख  यांनी शिष्यवृत्ती बाबत येणाऱ्या अडचणी मा. शिक्षणाधिकारी यांच्यासमोर मांडल्या. सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर त्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन मा. शिक्षणाधिकारी यांनी दिले.


 *मार्गदर्शन*


सुचीताताई पाटेकर  यांनी सलग एक तास शिक्षकांना मार्गदर्शन करीत शिक्षणाचा उद्देश स्पष्ट केला. शिक्षणाच्या खऱ्या पद्धतीची ओळख करून दिली आणि कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबलेले आहे  व ते आपणास आनंददायी पद्धतीने पुन्हा पूर्ववत सुरू करायचे असे  आवाहन सर्व मुख्याध्यापकांना केले. शिक्षणाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची ओळख सर्व मुख्याध्यापकांना करून दिली. गणितातील लिटर, मीटर यासारख्या संकल्पनांची  ओळख प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना द्यावी असे सुचवले. गणिताचा उद्देश व्यवहार करता येणे हा असल्याने बाजाराच्या दिवशी विद्यार्थ्यांना पालकांबरोबर बाजारात जाऊ देणे व झालेल्या सर्व कृतींची मांडणी त्यांच्या कडूनच करून घेणे अशा प्रकारचे उपक्रम राबवता येईल असेही सुचवले. दिवाळीमध्ये किल्ला बांधून इतिहास व भूगोल कसा शिकवता येईल याचेही मार्गदर्शन केले .कोरोना कालावधीत सुद्धा परभणी जिल्ह्यात शिक्षण बंद झाले नव्हते. ते नवीन पद्धतीने दिले. अभ्यास गटाची निर्मिती व त्याद्वारा झालेले शिक्षण या बाबतीत सखोल माहिती सर्व मुख्याध्यापकांना दिली.


उपशिक्षणाधिकारी माध्यमिक दिलीप  तायडे यांनी सर्व शिष्यवृत्ती करिता कशा प्रकारे नियोजन करावयाचे याबाबत माहिती दिली. शिष्यवृत्ती ची कागदपत्रे गोळा करतांना ‌दर्शनी भागावर पालकांसाठी कसे मार्गदर्शन उपलब्ध करून देता येईल याचेही विवेचन केले सोबतच त्यांच्या शैक्षणिक कार्य करतानाचे य अनुभव त्याठिकाणी मांडले. आपण आपले काम प्रामाणिकपणे केल्यास त्याला कौतुकाची थाप ही मिळतेच याचे ही उदाहरण स्वतःच्या अनुभवातून स्पष्ट केले. शिक्षकांना आवाहन करतांना  preparation, presentation and personality development या कशा डेव्हलप होत जातात या बाबतीत मार्गदर्शन केले. 


उत्कृष्ट अध्यापन होण्यासाठी शिक्षकांनी शिकवताना स्वतःला तीन प्रश्न विचारणे आवश्यक आहे त्या बाबतीत ही त्यांनी बोधात्मक विवेचन केले .विद्यार्थ्याला काय शिकायचे आहे? आपला विद्यार्थी शिकत आहे हे कसे माहिती पडेल? आणि आपल्या विद्यार्थ्याला एखादी गोष्ट समजली नाही तेव्हा शिक्षक म्हणून तुम्ही कोणती कृती कराल ? 

या गोष्टींचे विश्लेषण स्वतः शिक्षक करत असेल तर त्या शिक्षकांची , विद्यार्थ्यांची  प्रगती निश्चित होईलच यात शंका नाही असेही सांगितले. तायडे यांच्या वक्तृत्वातून त्यांचे इंग्रजी व गणितावर असणारे प्रभुत्व वेळोवेळी जाणवत होते. शिक्षक सर्व मुख्याध्यापक त्यांचे विश्लेषण अगदी खूप वेळ झाला तरीही तन्मयतेने, मन लावून शेवटपर्यंत ऐकत होते.



सत्कार


१) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तामसी येथे शाळेतर्फे एक मोठा हॉल बांधून नर्सरी ते केजी टू पर्यंत convent उघडण्यात आले. सदर कॉन्व्हेंट चे उद्घाटन हे पुढील काही दिवसातच होणार आहे. या बाबत  पाटेकर  यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तामसी चे मुख्याध्यापक श्री गजानन.चिंचोळकर  यांचे पुस्तक देऊन स्वागत केले.


२) अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा वाडेगाव येथील मुलांचा पट मागील तीन वर्षात 540 वरून 805 करण्यात करण्यासाठी माननीय समाधान सोर सर व त्यांच्या टीमने अथक प्रयत्न केले. सदर कार्याचा गौरव म्हणून पाटेकर यांनी पुस्तक देऊन  समाधान सोर यांचा सत्कार केला.


३)ऑनलाइन , आधार अपडेशन कार्यामध्ये बाळापुर तालुक्याची प्रगती फार उत्कृष्ट असल्याने पाटेकर यांनी श्री गौतम जी बडवे  यांचा ऑनलाईन सत्कार केला होता सदर सत्काराला मूर्तरूप देण्यासाठी त्यांनी आज पुन्हा एकदा त्याच कार्याचा गौरव म्हणून श्री. गौतम जी बडवे साहेब गटशिक्षणाधिकारी बाळापूर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.


४)व्याळा केंद्राचे केंद्रप्रमुख  देविदास  पवार  यांच्यासाठी व सर्व शिक्षकांकरता भूषणावह गोष्ट म्हणजे त्यांच्या तीनही मुली एमबीबीएस करीत आहे. त्यांच्या सर्वात मोठ्या मुलीने सध्याच NEET PG मध्ये 800 पैकी 520 गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. याबाबत सदर कुटूंबाचा सत्कार म्हणून मा. पाटेकर  यांच्या हस्ते पवार यांचा पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला..


मासिक सभा आढावा


श्री.पवार यांनी मासिक सभेच्या मुख्य विषयांचा परिचय सर्व मुख्याध्यापकांना करून दिला. त्यामध्ये आधार अपडेशन, ऑनलाइन शिक्षण, लसीकरणाकरिता जनजागृती, वृक्षारोपण, ऑडिट , आझादी का जश्न , स्वच्छता लिंक भरणे , अभ्यास गट या सर्व मुद्द्यांचा उहापोह केला.


     

विशेष बाब


सभेकरिता भाऊसाहेब तिरुख विद्यालयचे मुख्याध्यापक  कल्पना धोत्रे यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. सभा यशस्वी होण्यासाठी त्यांच्या संपूर्ण स्टाफचे उत्कृष्ट सहकार्य लाभले. सोबतच शाळेचे उपाध्यक्ष राजेंद्र तिरुख यांनी विशेष सहकार्य केले.


     

 सभेचे संचालन  स्वप्नील रताळे सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी खुरेशी यांनी अतिशय उत्कृष्टपणे व ओघवत्या शैलीमध्ये केले.सर्व मान्यवरांचे आभार रविंद्र कारंजकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारलिंगा यांनी केले.



आसाराम जाधव यांचा सत्कार




अकोला: जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम  जाधव यांची  धुळे येथे बदली झाली. निमित्ताने विदर्भ मुख्याध्यापक संघ तसेच जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी यांनी त्यांचा शाल श्रीफळ व मोमेन्ट देऊन सत्कार केला. त्यांनी क्रीडाविषयक केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.



याप्रसंगी विदर्भ मुख्याध्यापक संघ अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, जिल्हा विदर्भ संस्थेचे गजेंद्र काळे, सरफराज खान उपस्थित होते. 

टिप्पण्या