- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akola news letter: heavy rains: अतिवृष्टीचा इशारा: तेल्हारात वादळी वारा सह मुसळधार पाऊस, वीज पुरवठा खंडित
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला,दि.16: हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार बुधवार दि. 20 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टी व विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पामध्ये मोठा प्रमाणात जलसाठा असुन पाण्याची आवक लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याच्या अनुषंगाने सतर्कतेचा इशारा द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.
दरम्यान,आज सायंकाळी तेल्हाऱ्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस.वीज पुरवठा खंडित. 33 KV मणात्री मेन लाईन बंद झाली आहे. जवळपास 42 गावाना याचा फटका बसला असल्याचे वृत्त आहे.
Video पाहण्यासाठी येथे क्लीक करा
काटेपूर्णा प्रकल्प
आज दि. १६/१०/२०२१ रोजी सायंकाळी ५.३० वाजता काटेपूर्णा प्रकल्पाचे एकूण २ वक्रद्वारे प्रत्येकी ३० cm उंचीने उघडली असून नदीपात्रात एकूण ५१.१६ घ.मी./से एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे.पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे.
काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष
𝐊𝐚𝐭𝐞𝐩𝐮𝐫𝐧𝐚 𝐏𝐫𝐨𝐣𝐞𝐜𝐭
16/10/2021 5.30pm
𝐋𝐞𝐯𝐞𝐥 - 347.77 𝐦𝐭𝐫
𝐒𝐭𝐨𝐫𝐚𝐠𝐞 - 86.35 𝐦𝐦3
𝐏𝐞𝐫𝐜𝐞𝐧𝐭𝐚𝐠𝐞 - 100%
*******
लसीकरण
उद्या दिनांक 17/10/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.
1)नागरी आरोग्य केंद्र खदान आदर्श कॉलनी 16 नंबर शाळा नागरी
2)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी
3) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट
4)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
5)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
6) GMC अकोला
7) IMA hall सिव्हिल लाईन चौक, अकोला
8)नागरी आरोग्य केंद्र न्यू शिवाजी नगर शिवसेना वसाहत
मनपा शाळा
18+ च्या वरील नागरिकांकरिता *Covishield(100 ऑनलाइन अपॉइंटमेंट प्रथम डोस तथा द्वितीय डोस) [ 200 कूपन प्रथम डोस तथा द्वितीय डोस ]साठी
पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.
1)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड
2) लेडी हार्डिंग DHW
18+ च्या वरील नागरिकांकरिता *Covaxin (* 100ऑनलाइन अपॉइंटमेंट प्रथम डोस तथा द्वितीय डोस) [ 200कूपन प्रथम तथा द्वितीय डोस ]साठी
सकाळी 09 ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.
ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील
*अकोला महानगरपालिका अकोला.
कोरोना अलर्ट
*आज शनिवार दि.१६ ऑक्टोबर २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१७*
*पॉझिटीव्ह-शून्य*
*निगेटीव्ह-१७*
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शून्य+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य= एकूण पॉझिटीव्ह- शून्य
*अतिरिक्त माहिती*
आज दिवसभरात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-४३२६७+१४४२९+१७७=५७८७३*
*मयत-११३८*
*डिस्चार्ज-५६७१६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-१९*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा