Adventure sports and nature study camp in Melghat area: कोरोना काळानंतर पहिल्यांदाच मेळघाट परिसरात साहसी क्रीडा व निसर्ग अभ्यास शिबिर

Adventure sports and nature study camp in Melghat area for the first time after Corona period






ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: कोरोना विषाणू covid-19 मुळे संपूर्ण जगाचा गाडा एका जागेवर थांबला होता. आता हळूहळू सर्वच क्षेत्राची दारे उघडू लागली आहेत. गेल्या दीड ते दोन वर्षापासून घरात राहून सर्व मनस्तापी कंटाळलेल्या नागरिकांनी 2 व 3 ऑक्टोबर रोजी अकोला जिल्ह्यातील मेळघाट अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या अकोट तालुक्यातील सूर्या धबधबा ट्रेक, नरनाळा ट्रेक आणि एडवेंचर कॅम्पिंगचा आनंद लुटला. या शिबीराचे आयोजन अकोला डिस्ट्रिक्ट मौंटेनीरिंग असोसिएशन, वन्यजीव विभाग अकोट, संचालक पर्यटन विभाग कार्यालय अमरावती यांनी केले होते.


सुलाई धबधबा येथे शिबिर दरम्यान २०० फूट लांब, तळ्यावरुन २५० फूट उंच धबधब्याचा शिरकाव्याचा आनंद घेत रिवर क्रॉसिंग ही एडवेंचर ऍक्टिव्हिटी यशस्वी पूर्ण केली.




यांनी घेतला सहभाग



या शिबिरामध्ये सोहम काळे, भाविक मोरे, ऋचा जवळकार, सागरिका धोत्रे, अथर्व चौखंडे, तन्वी परत, पलक कोठारी, सूनय खडसे, निखिल बोर्डे, अथर्व चोपडे,अर्चित मावळे, गौरव कदम, विनय बिडवे, अभिलाषा खारकर, देव्यानी नेमाडे, सुहास पातूरडे, अभिषेक भाले, नीता पातूरडे, साक्षी भोम्बे, ओम राऊत, वेदांत राऊत, पार्थ देवकते, अनुप पाटील, सत्कर्ष नाकडे, प्राची नाकडे, कृष्णा खंडेलवाल, सोहम पाटील, हार्दिक सारडा, अभिषेक चितलंगे, चिन्मय पाटील, यश ढोरे, हर्ष गोयंका,श्रेया टावरी, गौरव टावरी, विवेक कोकाटे, शिला कोकाटे, रामदास खोडकुंभे, वैदेही खोडकुंभे, लक्ष साबळे या निसर्गप्रेमींनी सहभाग नोंदविला होता. 





शिबिरार्थीपैकी अभिषेक भाले यांनी भूगोल बद्दल प्राथमिक माहिती दिली. अमोल पवार यांनी गिर्यारोहण बद्दल चिमणी क्लाइंबिंग हा विषय घेऊन मुला-मुलींमध्ये एक नवीन ऊर्जा भरली. धिरज कातखेडे यांनी आकाशातील ढगा बद्दल प्राथमिक माहिती देऊन वातावरणाची जाणीव करून दिली. श्रीकांत गावंडे यांनी पाण्यातील बचाव विषयी मार्गदर्शन केले. ॲड.शिवम भौरदकर, सागरिका धोत्रे व ऋचा जवळकार यांनी कॅम्प फायर मध्ये गाणे व गिटार कौशल्य दाखवून सर्वांचे मन प्रसन्न केले. गाईड साबूलाल काजदे यांनी किल्ल्यांबद्दल आणि वन्य प्राण्यांबद्दल माहिती दिली. 






शिबिराच्या भोजन समिती व मुक्कामची जबाबदारी गोपाल खांडवाय आणि राजेश जालन यांनी यशस्वीरित्या पार पडली. या शिबिराचे नेतृत्व धिरज कातखेडे यांनी केले. 



शिबिराला अमोल पवार, महादेव गोरे (पदाधिकारी वाशीम डिस्ट्रिक्ट गिर्यारोहण संस्था), धनंजय भगत, पार्थ बोबडे, भारती खांडवाय, रंजिता खांडवाय, कुणाल खांडवाय, फाल्गुनी खांडवाय, जान्हवी खांडवाय, सलमान शेख, राजा मावस्कर, नंदकिशोर धांडे, कृष्णा, विकास, नितीन, गोपाल, संजू, राजेश, अनिता यांनी स्वयंसेवकाची भूमिका निभावली. 



नवलकिशोर रेड्डी, विवेकानंद काळकर,  सुनील वाकोडे, श्री गजानन महाराज संस्थान अकोली अकोलखेड (विहीर), मोतीलाल दारसिम्बे, हरीश टावरी यांचे सहकार्य लाभले.




टिप्पण्या