Rohini court: दिल्लीतील रोहिणी न्यायालयात गँगस्टर गोगीची हत्या:वकील बनून न्यायालयात आले हल्लेखोर, पोलिसांनी केले दोन हल्लेखोरांना ठार,अन्य एकाचा गोळीबारात मृत्यू

Gangster Gogi murdered in Delhi's Rohini court: Attackers come to court as lawyers





नवी दिल्ली, दि. 24 : राजधानी दिल्ली मधील रोहिणी कोर्टात शुक्रवारी दुपारी  गँगस्टर मोस्ट वॉन्टेड गँगस्टर जितेंद्र उर्फ गोगी याची हत्या झाल्यानंतर गोळीबार झाला आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.   


वकिलांच्या वेशात आलेल्या दोन हल्ले खोरांनी गोगीची हत्या केल्यानंतर गोळीबार झाला. पोलिसांनी हल्लेखोरांना ठार केले. आहे. यामध्ये आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात एक गँगस्टर गोगी याच्यासह दोन हल्लेखोरांचा समावेश आहे. तर अन्य एक जण आहे. ज्याची ओळख अद्याप पटली नाही.


गुंड गोगी हा तिहार जेलमध्ये होता. शुक्रवारी दुपारी त्याला सुनावणीसाठी कोर्टात आणले होते. या दरम्यान रोहिणी कोर्टात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. हल्लेखोर हे वकिल बनून आले होते.




दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर वकिल बनून कोर्टात आले होते. ज्यांनी गँगस्टर गोगीवर गोळीबार केला. स्पेशल सेलची टीम गोगीला कोर्ट रुममध्ये घेऊन गेली होती. जिथे ही घटना घडली आहे. दिल्लीच्या टिल्लू गँगने गोगीची हत्या केली असल्याचे समोर येत आहे. जे दोन हल्लेखोर ठार झाले आहे. त्यापैकी एकाच नाव राहुल असून त्याच्यावर 50 हजारांचे बक्षीस जाहीर केले होते.



दरम्यान, देशभरातील न्यायालयात सुरक्षा संदर्भातील प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे.


टिप्पण्या