Renuka Mata temple:Mahurgad: ropeway:Navratri 2021:Nanded: माहूर गडावरील रेणुकामाता मंदिरात 'रोप वे' ने जाऊन दर्शन घेण्याचे भाविकांचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येणार

The dream of devotees to visit Renuka Mata temple on Mahur gad by 'rope way' will soon come true



औरंगाबाद, दि. 26 : श्री रेणुकामातेचे देवस्थान असलेल्या माहूर गडावर 'रोप वे' उभारण्यासंदर्भात राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या 'वॅपकॉस लिमिटेड' मध्ये करार करण्यात आला असून, यामुळे या विकासकामाला गती मिळणार आहे.नवरात्री उत्सवा पूर्वी हा करार झाल्याने रेणुका माता भक्तांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.


सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत बांधकाम विभागाच्या औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे आणि 'वॅपकॉस'चे प्रतिनिधी दीपांक अग्रवाल यांनी औरंगाबाद येथे या करारावर स्वाक्षरी केली.




माहूर गड येथील रेणुकादेवी मंदीर, श्री दत्त शिखर मंदीर, अनुसया माता मंदिरासाठी 'रोप वे' उभारणे तसेच रेणुकादेवी मंदिरासाठी 'फुट ओव्हर ब्रीज' व 'लिफ्ट' उभारण्याच्या कामाला केंद्रीय मार्गनिधी अंतर्गत सुमारे ५१ कोटी रूपयांची मंजुरी मिळाली आहे. 


याबाबतच्या करारावरही स्वाक्षरी झाल्याने देवीच्या साडेतीन शक्तीपीठांमध्ये समावेश असलेल्या रेणुकामातेच्या मंदिरात 'रोप वे'ने जाऊन दर्शन घेण्याचे भाविकांचे स्वप्न लवकरात लवकर पूर्णत्वास येणार आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर विशेषतः वयोवृद्ध भाविकांचा त्रास कमी होणार असून, माहूर गडाला भेट देणाऱ्या नागरिकांमध्ये मोठी वाढ होणे अपेक्षित आहे. त्यातून या तीर्थक्षेत्राच्या विकासाला अधिक गती मिळेल,अशी आशा व्यक्त होत आहे.

टिप्पण्या