Political news: sanjay raut:Anil parab:,chandrakant patil:Akola: संजय राऊत यांचा अमेरिकेचाही अभ्यास असू शकतो; तर अनिल परबांचे घोटाळे नवे नाहीत -चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षावर लागावले टोले

    BJP leader Chandrakant Patil




 

नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: बेळगाव महापालिकेत 30 पेक्षाही अधिक जागा जिंकू, असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या वक्तव्याची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली. बेळगाव जिंकेल असा जर राऊत दावा करीत असतील तर त्यांचा अमेरिकेचाही अभ्यास असू शकतो, असा खोचक टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अकोला येथे प्रसार माध्यमांशी बोलताना लगावला.


यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला. ओबीसींना आरक्षण देणे खूप सोपं आहे. मात्र या सरकारला आरक्षण द्यायचं नाही, असा थेट आरोप त्यांनी केला. तसेच,  शिवसेना नेते अनिल परब यांच्यावरही निशाणा साधून अनिल परबांचे घोटाळे नवे नसून, जुनेच घोटाळे आहेत, असे देखील म्हणाले.



आगामी निवडणुकीमध्ये भाजपाच्या पाठीशी जनता जनार्दन



पक्ष संघटना व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासात्मक कामाच्या तसेच सकारात्मक विरोधकांची भूमिका सामाजिक दायित्व व कर्तव्याच्या भावनेतून पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा राष्ट्रीय एकात्मता वादाच्या अनुसरून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता समाजसेवेत कटिबद्ध असून, आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी जनता जनार्दन मोठ्या संख्येने उभी राहील महाशक्तिशाली राष्ट्र निर्माणासाठी आशीर्वाद प्रधान करणारच, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.



स्थानिक सर्किट हाऊस येथे अकोला जिल्हा भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी महानगर व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करताना ते बोलत होते. 



महाराष्ट्रात अराजकतेचा स्वरूप असून प्रत्येक क्षेत्रात खंडणीखोर भूखंड माफिया भ्रष्टाचारी बदली खोर विकास कामांना विलंब लावून त्यातून पैसे कमी करण्याचा मार्ग लावण्याचा व प्रत्येक बाबतीमध्ये केंद्र सरकारला दोषी दाखवण्यास दोषी ठरवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. विरोधकांचा आवाज दाबून गुन्हे दाखल करून प्रत्येक बाबतीमध्ये गप्पांचा व मोफत सल्ला देण्याचे केंद्र शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार निवडला आहे,अशी टीका पाटील यांनी केली. 



अतिवृष्टी झाल्यानंतर सुद्धा 45 दिवस झाल्यावर सुद्धा दमडी  मदत केली नाही भेदभाव करणारा बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीवर अन्याय करणारा ओबीसी मराठ्यांना आरक्षण न देणारा सरकार असून या सरकारच्या नाकर्तेपणाचा व हिंदुविरोधी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, असेही आवाहन चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी केले 


यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व अकोला जिल्हा प्रभारी आमदार डॉक्टर संजय कुटे, संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, भाजपा प्रवक्ता डॉक्टर अनिल बोंडे, जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, तेजराव थोरात, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, भाजपा प्रदेश पाध्यक्ष संजय भेंडे, महापौर अर्चना ताई मसने, किशोर पाटील, जयश्री पुंडकर, मोनिका गावंडे, नयना मनतकर, अश्विनी  हातवळणे, चंदा शर्मा, देवाशिष काकड, सुभाष सिंग ठाकूर, सुभाष खंडारे सतीश ढगे, अजय शर्मा, विजय इंगळे, गिरीश जोशी, सिद्धार्थ शर्मा, हरिभाऊ काळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.



जेष्ठ नेते मदनलाल खंडेलवाल यांची घेतली भेट



भाजपाचे जेष्ठ आघाडीचे नेते व माजी जिल्हाध्यक्ष मदनलाल खंडेलवाल यांची भेट घेऊन त्यांचे प्रकृतीची विचारपूस करून आशीर्वाद भाजप नेत्यांनी घेतले तसेच भाजपाचे ज्येष्ठ आमदार आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निवासस्थानी भेट तसेच जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानी सुद्धा व भाजपा पदाधिकारी यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी सुद्धा त्यांनी चर्चा विनिमय केला.

टिप्पण्या