Navratri:Temple:school reopen: मोठा निर्णय: नवरात्री पासून राज्यातील मंदिरे, प्रार्थना स्थळे खुली होणार;तर 4 ऑक्टोबर पासून शाळेची घंटा वाजणार

Big decision: Temples and places of worship in the state will be open from Navratri, while school bells will be rung from 4 october (file photo)



मुंबई: कोविड  संकटात राज्यातील मंदिरे दीड वर्ष पासून बंद आहेत.आता मात्र परिस्थिती पूर्व पदावर येत आहे. यासाठी नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आहे.



यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा सामना केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.


धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये,असे देखील मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.


दरम्यान, राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळा येत्या 4 ऑक्टोबरपासून सुरु करणार असल्याचा निर्णय जाहिर केला आहे. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री कार्यालयाने मंदिरे उघडण्यासंदर्भात निर्णय जाहीर केला..

टिप्पण्या